शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मानव विकासच्या बसेस आता सामान्य प्रवाशांच्या सेवेत

By admin | Updated: April 25, 2015 01:14 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचे १८ एप्रिलपर्यंत ठराविक २१५ दिवस पूर्ण झालेले आहेत.

गोंदिया : मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचे १८ एप्रिलपर्यंत ठराविक २१५ दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे गोंदिया आगारातील मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २० बसेस आता १९ एप्रिलपासून प्रवाशी सेवेसाठी धावत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिली आहे.शाळांना सुट्टी लागल्यानंतर मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस निव्वळ उभ्या ठेवता येत नाही. शिवाय गोंदिया आगाराला अतिरिक्त बसेसची गरज आहे. त्यामुळे विविध मार्गावर या बसेस आता धावू लागल्या आहेत. याशिवाय उन्हाळी नियोजनासाठी काही बंद असलेल्या फेऱ्यासुद्धा २० एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या आहेत. यात नवीन सुरू करण्यात आलेली गोंदिया-अमरावती बस गोंदिया आगारातून सकाळी ९.१५ वाजता सुटते. ही बसफेरी नागपूर-काटोल-मोर्शी मार्गे धावत आहे. गोंदिया-पूलगाव बसफेरी वर्धा मार्गे धावत आहे. गोंदिया-आर्वी बसफेरी तळेगाव मार्गे धावत आहे. गोंदिया ते नागपूर तीन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून साकोली मार्गे दोन तर तुमसर मार्गे एक बस धावत आहे. आमगाव ते देवरी बसफेरी सुरू करण्यात आली असून कोहमारा ते देवरी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सालेकसा तालुक्यातील खेडेपार येथे गोंदिया आगाराच्या बसेसच्या दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कामठा व गिरोला मार्गावर प्रत्येकी दोन-दोन फेरा वाढविण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात प्रवाशी संख्या वाढल्यास गोंदिया-आमगाव चार नॉन स्टॉप फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले आहे. शिवाय गोंदिया-बालाघाट मार्गे सुरू असलेल्या बसफेऱ्या एक फेरी सोडून सर्व नॉन स्टॉप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. २० एप्रिलपासून नागपूरला जाण्यासाठी गोंदिया-बालाघाट-नागपूर बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)