शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोदक स्पर्धेला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: September 15, 2016 00:33 IST

गणपती महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक गजानन मंदिर सिव्हील लाईन गोंदिया येथे मोदक बनाओ व वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया : गणपती महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक गजानन मंदिर सिव्हील लाईन गोंदिया येथे मोदक बनाओ व वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात श्री गणेश यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण ३५ सखी सहभागी झाल्या होत्या. मोदक बनाओ या स्पर्धेमध्ये प्रथम सरोजनी लांजेवार, द्वितीय वंदना अनगुरे, तृतीय पुष्पा अंबुले यांनी पटकाविले. सर्व स्पर्धकांना तसेच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बक्षीस देण्यात आले. संचालन व आभार लोकमत इव्हेंट्सच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी तर आभार विभाग प्रतिनिधी योगीनी पथ्थे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रुपाली खराबे, स्मिता शरणागत, शालू कृपाले, हिमेश्वरी कावळे यांनी सहकार्य केले. देवरी : गणपती उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक माँ धुकेश्वरी सभागृहात देवरी येथे मोदक बनाओ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्व. जोत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञा संगीडवार, प्रा. वर्षा गंगणे उपस्थित होत्या. मोदक बनाओ स्पर्धेमध्ये एकूण २० सखींनी भाग घेतला. यामध्ये प्रथम रोशनी राजग्री, द्वितीय शुभांगी घोडेसेवार, तृतीय गीता शाहू यांनी पटकाविला. अतिथीच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. संचालन व आभार लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका क्षिप्रा तिराले यांनी केले. यशस्वीतेसाठी स्मिता पिल्लेवार, सोनीया मीते, कपाली शाहू, लक्ष्मी पंचमवार, गायत्री पारधी, पुष्पा धुर्वे, कवीनी मडावी यांनी सहकार्य केले. गोरेगाव : गणपती उत्सवाचे औचित्य साधून लोकमत सखी मंच गोरेगावच्या वतीने स्थानिक एकदंत गणेश मंदिर येथे मोदक बनाओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्री गणेश यांच्या प्रतिनीधीला माल्यार्पण करुन करण्यात आली. यामध्ये प्रथम रिया येडे, द्वितीय प्रगती भड तर तृतीय आशा पाटील यांनी पटकाविला. संचालन संयोजिका वैशाली कोटेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी लक्ष्मी चौरसिया, गीता तांडेकर, दिप्ती बारेवार, वंदना पटीये, निर्मला भुरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)