शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कसे रोखणार कोरोनाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी शनिवारी (दि.२६) चार डॉक्टर आणि सहा अधिपरिचारिकांच्या नागपूर जिल्ह्यात प्रतिनियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर ग्रामीण भागात काेरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना लसीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देआरोग्यसेवा सलाईनवर : जिल्ह्यातील डॉक्टर प्रतिनियुक्तीवर नागपूरला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतानाच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिपरिचारिकांना नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागात आधीच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे आरोग्य सेवा सलाईनवर आली आहे. अशात येथील डॉक्टर आणि अधिपरिचारिकांना तिथे प्रतिनियुक्तीवर पाठविल्याने जिल्ह्यात कोरोनाला रोखणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी शनिवारी (दि.२६) चार डॉक्टर आणि सहा अधिपरिचारिकांच्या नागपूर जिल्ह्यात प्रतिनियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर ग्रामीण भागात काेरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना लसीकरण सुरू आहे. यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र असे असताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील डॉक्टर आणि अधिपरिचारिकांना नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सलाईनवर आली असून याचा कोविड लसीकरणावरसुध्दा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 ग्रामीण भागात कोरोनाला रोखणार कसेकोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन शासनाने आरोग्य विभागाला यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अशात आता ग्रामीण भागातील डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर बाहेर पाठविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाल्यास तेथील परिस्थिती रोखणार कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अर्धा स्टॉफ नागपूर तर अर्धा गोंदियात  जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुुल समजल्या जाणाऱ्या चिचगड आणि अर्जुनी मोरगाव, सौदंड येथील रुग्णालयाचा अर्धा स्टॉफ सध्या गोंदिया तर अर्धा स्टॉफ नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. अशातच या तिन्ही तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून तेथील रुग्णालयात काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या