शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही अजून किती दिवस रबर स्टॅम्पप्रमाणे राहायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल १८ महिने लांबली. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात निवडणूक घेऊन १९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. मतदारांनी आपला कौल देत आपल्या क्षेत्राचे प्रतिनिधी निवडले. मात्र ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने जिल्हा परिषद आणि आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम महिनाभरापासून जाहीर झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी लोटला; पण अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सदस्य महिनाभरापासून नामधारीच असल्याने त्यांचाही संताप वाढत असून, आम्ही अजून किती दिवस असेच रबर स्टॅम्पप्रमाणे राहायचे, असा सवाल त्यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल १८ महिने लांबली. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात निवडणूक घेऊन १९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. मतदारांनी आपला कौल देत आपल्या क्षेत्राचे प्रतिनिधी निवडले. मात्र ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने जिल्हा परिषद आणि आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम महिनाभरापासून जाहीर झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापन करण्याच्या हालचालीसुध्दा थंड बस्त्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर बुधवारी (दि.२) सुनावणी होणार आहे. यानंतरच अध्यक्ष आणि सभापतिपदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र निवडून आलेले सदस्य मागील महिनाभरापासून केवळ नामधारी ठरत असून, त्यांना जिल्हा परिषदेत अथवा पंचायत समितीत जाऊन आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही. त्यामुळे त्यांचाही मनस्ताप वाढत आहे. जिल्ह्यात विविध विकासकामांच्या निधीचे नियोजन करण्यासाठी मार्च महिना हा महत्त्वपूर्ण समजला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राज सुरू असल्याने अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. त्यातच येत्या दहा-पंधरा दिवसात सत्तेचा तिढा न सुटल्यास आर्थिक वर्षाचे नियोजनसुद्धा अधिकाऱ्यांच्या मर्जीने होणार असल्याचे बोेलले जात आहे. त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेण्याचा सूर सदस्यांकडून आवळला जात आहे.

सर्वच पक्ष देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - निवडणुका होऊन महिनाभराचा कालावधी लोटला पण अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. तर जिल्हा निवडणूक विभागाकडून ग्रामविकास मंत्रालयाकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला कंटाळून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हालचाली सुरू - एकूण ५३ सदस्यीय गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक २६ सदस्य निवडून आले. काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या आकड्याची गरज आहे. भाजपने अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.  

महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरणार मुंबईत- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी करुन सत्ता स्थापन करायची काय यावर मुंबई येथे मंथन होणार असून त्यातच महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद