शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हाऊसफुल्ल ‘एसटी’चे दिवाळी विशेष नियोजन

By admin | Updated: October 21, 2016 01:38 IST

दरवर्षी दिवाळीच्या सणात एसटीच्या गोंदिया आगाराकडून प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले जाते.

स्कूल बसेसही प्रवासी सेवेत : देवरीमार्गे पाच फेऱ्या नागपूरसाठी धावणारगोंदिया : दरवर्षी दिवाळीच्या सणात एसटीच्या गोंदिया आगाराकडून प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले जाते. यावर्षीसुद्धा गोंदिया आगाराने दिवाळी सुट्ट्यांसाठी अतिरिक्त बसेस चालविण्याचे १० दिवसांचे नियोजन केले आहे. याचा अतिरिक्त आर्थिक लाभही गोंदिया आगाराला दरवर्षीप्रमाणे मिळणार आहे. इतर दिवशी ८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असणाऱ्या गोंदिया आगाराला दिवाळीत ९ ते ९.५ लाख प्रतिदिवस उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक पदे रिक्त असल्यामुळे हे नियोजन किती यशस्वी होते याबाबत साशंकता आहे.गोंदिया आगारातून गोंदिया-नागपूर अशा सात बसेस धावणार आहेत. बस (५२२१-५२२२) गोंदिया-नागपूर-गोंदिया ही बस सकाळी ९ वाजता गोंदियातून सुटेल व व्हाया देवरी होत नागपूरला दुपारी २.४५ वाजता पोहचेल. तर नागपूरवरून ३ वाजता सुटेल व साकोली -कोहमारा मार्गे सायंकाळी ७ वाजता पोहचेल. बस (५२०३-५२०४) गोंदियावरून सकाळी ६.३० वाजता सुटेल व नागपूरला १०.३० वाजता पोहचेल. तर नागपूरवरून सकाळी ११ वाजता सुटेल व व्हाया देवरी ४.१५ वाजता पोहचेल. पुन्हा गोंदियावरून व्हाया देवरी होत नागपूरला जाणारी बस गोंदियातून सकाळी १०.३० वाजता सुटेल व ३.४५ वाजता नागपूरला पोहचेल. तर नागपूरवरून ४.३० वाजता सुटेल व साकोली-कोहमारा मार्गे रात्री ८.३० वाजता गोंदियाला पोहचेल. तर सकाळी ९.१५ वाजता गोंदियातून सुटणारी बस नागपूरला १.१५ वाजता पोहचेल. ती परतीसाठी नागपूरवरून २.३० वाजता सुटेल व देवरी मार्गे सायंकाळी ७.४५ वाजता गोंदियाला पोहचेल. याशिवाय सकाळी ६ वाजता गोंदियातून व्हाया देवरी नागपूरसाठी बस सुटेल. ती नागपूरवरून १२.१५ वाजता परतीसाठी निघेल व साकोली-कोहमारामार्गे ४.१५ वाजता गोंदियाला पोहोचेल. याशिवाय गोंदिया आगारातून नागपूरसाठी कोहमारामार्गे दुपारी १२.३० वाजता, तुमसर-भंडारा मार्गे सकाळी ७ वाजता व सकाळी ८ वाजता बसेस सुटतील. याशिवाय लांब पल्ल्याच्या अंतरासाठी गोंदिया-अमरावती ही बस सकाळी ९.१५ वाजता गोंदियातून सुटेल. साकोली-नागपूर-तळेगाव मार्गे सायंकाळी ५.०५ वाजता अमरावती येथे पोहचेल व तेथे रात्रीला मुक्कामी राहील. यानंतर दुसऱ्या दिवसी सकाळी ६ वाजता अमरावतीवरून सुटेल व दुपारी १.३० वाजता गोंदियाला पोहोचेल. याशिवाय जिल्ह्यांतर्गतही अर्धा ते पाऊस तासाच्या अंतराने अनेक फेऱ्या होणार आहेत. गोंदिया-सालेकसा, गोंदिया-आमगाव, गोंदिया-गिरोला अशा अनेक फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. याशिवाय दिवाळी सणामध्ये शाळांना सुट्ट्या राहणार असल्याने या कालावधीत मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेसही जिल्ह्यातच प्रवासी सेवेसाठी धावणार आहेत. (प्रतिनिधी)