शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स झाले सुरू पण ग्राहकांचेच वेट अँन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स व्यवसायिकांना वेळेबाबत अजुनही स्पष्ट सूचना न दिल्याने सायंकाळी ७ वाजतापर्यंत अन्य व्यवसायांप्रमाणेच हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल्सचा व्यवसायच रात्रीला सुरू होत असून सायंकाळी ७ वाजता हॉटेल्स बंद करावे लागणार असल्याने व्यवसायी नाराज आहेत.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : वेळेच्या निर्बंंधाने व्यवसायिक नाराज

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुमारे ६ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर राज्य शासनाने हॉटेल्स उघडण्यास सोमवारपासून (दि.५) परवानगी दिल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स उघडण्यात आलेत. मात्र काही व्यवसायीकांनी अद्यापही वेट अ‍ॅन्ट वॉचची भूमिका घेत हॉटेल्स उघडलेच नाहीत. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा सुध्दा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स व्यवसायिकांना वेळेबाबत अजुनही स्पष्ट सूचना न दिल्याने सायंकाळी ७ वाजतापर्यंत अन्य व्यवसायांप्रमाणेच हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल्सचा व्यवसायच रात्रीला सुरू होत असून सायंकाळी ७ वाजता हॉटेल्स बंद करावे लागणार असल्याने व्यवसायी नाराज आहेत. अशात राज्य शासनाने आता अनलॉक ५ अंतर्गत सर्वच काही सुरू केले असताना हॉटेल्सलाही वेळेच निर्बंध लावू नये अशी मागणी व्यवसायी करीत आहेत.घेतली जाणारी दक्षता : कोरोनाचा संसर्ग बघता अन्य व्यवसायीकांप्रमाणे हॉटेल्स व्यवसायीकांनीही शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन ठेवली आहे. सॅनिटायजरचा वापरही करीत आहेत. काही व्यावसायिकांनी डिस्पोजेबल भांडयांचा वापर सुरू केला आहे. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचेही काटेकोरपणे पालन केले जात होते.वेळेला घेऊन संभ्रमराज्य शासनाच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील हॉटेल्सही सुरू होणार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासाठी काही विशेष सूचना दिलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, रात्री किती वाजतापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवायचे याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या नसल्याने व्यवसायी संभ्रमात आहेत.हॉटेल्स सुरू झाल्याने खवय्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सायंकाळी ७ वाजतापर्यंतच हॉटेल्स सुरू राहणार असल्याने कुटुंबासह ज्यांना जेवणासाठी जायचे आहे त्यांची मात्र गैरसोय होणार आहे.-विजय कोरे,ग्राहकजिल्ह्यातील स्थिती बघता सायंकाळी ७ वाजतापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवायचे आहेत. मात्र आमचा व्यवसायच रात्रीला सुरू होतो. यामुळे आता हॉटेल्स सुरू होऊनही काही फायदा नसल्याने वेळेचे निर्बंध हटविण्याची गरज आहे.-अखिलेश सेठअध्यक्ष, हॉटेल व्यवसायी असोसिएशन

टॅग्स :Marketबाजार