शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आठ एकरात बागायती शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:19 IST

तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला.

ठळक मुद्देहिरापूर येथील प्रयोग : कृृषी विभागाची बागायती शेतीकडे उदासीनता

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेतुन २५ लाखाचे कर्ज घेतले. हा तालुक्यातील पहीला यांत्रिक शेतीचा प्रयोग होता.सन २००७ मध्ये ७ एकर शेतीत ऊसाची लागवड केली. या पिकापासुन धानापेक्षा जास्त उत्पन्न मिळविले. तर सन २०१५ पासुन ऊसाच्या शेतीसोबतच आता ८ एकरात बागायती शेती करण्यासाठी कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. मनात जिद्द असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांनी माहीती मिळविली. बागायती शेती ही शेंद्रीय शेती असावी यासाठी त्यांनी ६ दुधारी गायी विकत घेतल्या, शेतात १ विहीर व १ बोअरवेल तयार करु न ड्रीप पद्धतीने गोमुत्र व पाणी देण्याला सुरु वात करीत शेणखताचा प्रयोग सुरु केला. ४ एकरात डाळींब व ४ एक रात मोसंबी, दाळ निंबूची लागवड केली.कृषी विभागाने बागायती शेती विषयी मार्गदर्शन करावे यासाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे बिसेन यांनी धाव घेतली. परंतु याकडे कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.जिल्हात हिरापुर या गावी बागायतदार शेतकरी आहे अशी माहीती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांना मिळताच त्यांनी दोन वेळा या बागायती शेतीला भेट देवून झाडे कशी लावावी त्याचे अंतर किती असावे तसेच या सुटलेल्या जागेत आंतरपीक घ्यावे अशी माहिती दिली होती.बागायती शेतीला वाव देण्याची गरजकृषी विभाग तंत्रज्ञान, शासकीय अनुदानाची माहीती देत नाही. तसेच अतीवृष्टी व वादळीवारा यापासुन बागायती शेतीला नुकसान झाले तर कृषी सेवक, तलाठी व ग्रामसेवक यांना नुकसानीच्या माहीती अभावी पंचनामा करता येत नाही. धानाला हमीभाव देण्यात येतो पण बागायती शेती पिकांना हमी भाव नाही. शासनाने बागायती शेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठ सुरु करावी, शितगृह बांधावे हे उपलब्ध नसल्याने भाव मिळत नाही मोसंबी व अनार हे पीक नागपुरला विकण्यास न्यावे लागत आहे. हा खर्च परवडणारा नसल्याने उत्पन्नात घट होत आहे. याकरीता राष्ट्रीय बागवानी बोर्ड नागपुर, जिल्हा कृषी अधिकारी व बँकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. शेतकरी पारंपारीक भात शेती करतो, त्यामुळे आर्थिक अडचनीत असतो व बँकेची कर्ज परतफेड करु शकत नाही. त्यामुळे बँका बागायतदार शेतकरी यांना कर्ज देत नाही. आर्थिक मदतीशिवाय शेतकरी शेती करु शकत नाही. जिल्हात बागायती शेतीला वाव देणे गरजेचे आहे असे बिसेन यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती