शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलांच्या भटकंतीने नागरिकांमध्ये दहशत

By admin | Updated: June 10, 2015 00:46 IST

बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

 बरबसपुरातील घटना : वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न करावेकाचेवानी : बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. रानटी डुक्कर व एकल यांची ये-जा नियमित असली तरी अस्वलांची भटकंती प्रथमच दिसून आली आहे. बरबसपुरा, काचेवानी, मेंदीपूर हे गाव अदानी प्रकल्पाला लागून असून झुडपी जंगल लागूनच आहे. गावच्या आजूबाजूचे परिसर सपाटीकरण केल्यामुळे जंगलातील हिंसक पशू गावाकडे धाव घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डुकराने गावात प्रवेश करून तीन स्त्री-पुरूषांना गंभीर जखमी केले होते. गावकऱ्यांनी एकत्रित होऊन त्या डुकरांचा गावातच मुदडा पाडल्याची घटना घडली होती. गावात आताही डुकरांची ये-जा सुरू असून घरालगत असलेले सुरण व अन्य जमिनीतील कंद खोदून खातात. धान्य पिकांची नासाडी करीत आहेत. जंगली डुक्कर घराशेजारी येत असल्याने अनेक कुटुंबीय भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. तीन-चार दिवसांपासून दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे गावकऱ्यांत तसेच शेतकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतीच्या कामाला सुरूवात झाली असून शेतात मुलाबाळांना सोबत घेऊन महिला वर्ग जात आहे. अशातच दोन अस्वलांना पाहून शेतात काम कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात पाच वर्षांपूर्वीपासून जंगली पशंूच्या भटकंतीमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र वनविभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. आता अस्वलांच्या भटकंतीमुळे व बरबसपुरा गाव शिवारात त्यांचा वावर असल्याने नागरिक घाबरत आहेत. पोलीस पाटील बन्सीलाल रहांगडाले यांच्या शेताजवळ सायंकाळी ७.३० वाजता बरबसपुरा-भिवापूर मार्गावर शेतकऱ्यांनी आणि ये-जा करणाऱ्यांनी या अस्वलांना पाहिले. तर रात्रीला बरबसपुरा येथील रहिवाशी मन्साराम उईके यांच्या घर परिसरात बसलेले अस्वल प्रत्यक्ष पाहण्यात आले. मात्र त्यांना गावातील नागरिकांनी जंगली भागाकडे पळविण्यात यश मिळविले. वन विभागाने या अस्वलांचा बस्तोबंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)बंदोबस्ताची मागणी बरबसपुराचे सरपंच ममता लिचडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन अस्वल आणि एकल हे गावालगत तसेच गावात वावरत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती वनविभागात देण्यात आली असून वनविभागाने तातडीने रोकथाम करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आल्याचेही त्या बोलल्या.