शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पीठ गिरणीतून ‘आशा’ने दूर केली ‘निराशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:27 IST

तिरोडा तालुक्याच्या घोगरा येथील तुटपुंज्या शेतीत उदरनिर्वाह करणाºया आशा भांडारकर ह्या गावातील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांनी गटातून कर्ज घेवून पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबातील आर्थिक निराशा दूर केली.

ठळक मुद्देप्रगती स्वयंसहायता महिला बचत गट : ग्रामस्थांची पायपीट झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या घोगरा येथील तुटपुंज्या शेतीत उदरनिर्वाह करणाºया आशा भांडारकर ह्या गावातील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांनी गटातून कर्ज घेवून पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबातील आर्थिक निराशा दूर केली. घोगरा येथून दोन किमी अंतरावर मुंडीकोटा येथे दळण दळण्याकरिता ग्रामस्थांची होणारी पायपीट दूर झाली.जेव्हा घोगरा गावात गटबांधणीला सुरूवात झाली तेव्हा आशा यांनीसुद्धा गटात प्रवेश केला. गटाच्या बैठकीत सहयोगीनीने कर्ज घेवून व्यवसाय थाटून कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रवृत्त केले. तेव्हा काही महिलांनी कर्जाची मागणी केली. गावामध्ये एकही पीठ गिरणी नव्हती. त्यामुळे महिलांना, घरच्या मंडळींना दळण दळण्यासाठी दोन किमी अंतरावरील मुंडीकोटा येथे जावे लागत होते. महिलांना त्रास होवू नये, या हेतूने आशाने पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. घरातील कामे सोडून दळण दळण्यासाठी शेजारच्या गावात जावे लागते. त्यामुळे गटाच्या बैठकीत पीठ गिरणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सहकार्याने महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करुन दिला. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे माविमला सहकार्य असल्याने तेथे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्यानुसार प्रक्रिया केल्यावर प्रगती महिला बचत गटाला बँकेकडून एक लाख २० हजार रूपयांचे कर्ज मिळाले.आशा भांडारकर यांनी ते कर्ज घेवून मोठी पीठ गिरणी सुरू केली. तसेच मिळणाºया पैशातून हप्ते चुकविले. उत्पन्नात भरपूर वाढ झाली. त्यामुळे आता त्यांना पैशाची अडचण जाणवत नाही. त्यांना दोन मुले असून त्यांना सोबतील घेवून सदर काम सांभाळतात. आता त्यांना त्यांच्या जनावरांकडे नीट लक्ष देता येते. रोजंदारीवर न जाता घरात मानाने काम करून पैसे मिळविण्याचा मार्ग सापडला. हा फायदा किरकोळ वाटत असला तरी दुर्लक्ष करण्यासारखे नाही. हे अनेक महिलांना पटले आहे. केवळ बचत गट, ग्रामसंस्थेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली व त्या स्वत:च्या पायावर उभे झाल्या.आर्थिक व वैयक्तिक अडचणी सोडविण्यास मदतमहिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत घोगरा येथे कौशल्य ग्रामसंस्था आहे.पशुपालन हा गावातील मुख्य व्यवसाय आहेत. गावात एकूण १३ स्वयंसहायता महिला बचत गट आहेत. त्यापैकी प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या आशा मधुकर भांडारकर सदस्य आहेत. आता या गटातील सर्व महिला मिळून सीआपी यांच्या सहकार्याने गटाच्या नियमित बैठका घेतात.