शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा सन्मान हा गावाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:01 IST

स्त्री एक शक्ती आहे. ती अबला नाही तर सबला आहे. वेळोवेळी स्त्रियांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून समाजाला हे दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्ष उषा मेंढे : दारुबंदी व महिला जागृती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : स्त्री एक शक्ती आहे. ती अबला नाही तर सबला आहे. वेळोवेळी स्त्रियांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून समाजाला हे दाखवून दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांनी काबीज केले आहे. चूल व मूल या मर्यादेतून ती बाहेर पडली आहे. मात्र ग्रामीण भागात पाहिजे तो सन्मान स्त्रियांना मिळत नाही नसल्याचे चित्र पहायला मिळते, हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा मान-सन्मान दिला पाहिजे कारण महिलांचा सन्मान हा गावाचा सन्मान आहे, असे मत जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केले.(रायपूर) येथे दारुबंदी व महिला जागृती मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावररून बोलत होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सागर काटेखाये, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कला बहेकार, उपसरपंच दुर्वास दोनोडे, तंमुस अध्यक्ष भरतराम चन्ने, पोलीस पाटील मोहनसिंह बघेल, सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ दोनोडे, ग्रा.पं.सदस्य कस्तुरा ब्राम्हणकर, उषा बिसेन, मोहन बघेले, भिवराम मेश्राम, तेजूलाल हरिणखेडे, प्रेम कोरे, गुड्डू बिसेन, शिवकुमार राणे, जीवनलाल बहेकार उपस्थित होते.माता शारदा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्व महिलांनी गावात दारुबंदीची घोषणा केली. गावात काही विघ्नसंतोषी लोकांनी अवैध दारुविक्री सुरु केली होती. ते दुकान महिलांनी एकत्र येवून बंद पाडली. यात बचत गटाच्या महिलांचा मोठा वाटा आहे. पुढे गावात दारूपिणे, दारू विकणे यासारखे प्रकार घडल्यास दंड लावण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. प्राचार्य काटेखाये यांनी दारुमुळे होणारे नुकसान, स्त्रीभृण हत्या, बालविवाह, हुंडा पद्धती, कौटुंबिक हिंसाचार यावर मार्गदर्शन केले. संचालन दिव्या पटले तर आभार प्रिया पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी लक्ष्मी महिला बचत गट, जयसेवा बचत गट, राणी दुर्गावती, दुर्गा, सहेली, आदर्श, ओम साई, लक्ष्मी, दत्त, कर्तव्य महिला गटांनीसहकार्य केले.