आमगाव : भारतीय संस्कृतीचे प्रतीक व सर्वांचे आराध्य दैवत श्रीरामप्रभूंचे जन्मस्थान अयोध्या येथे होत असलेल्या मंदिर निर्माण कार्यासाठी राम मंदिर ते राष्ट्र मंदिरची संकल्पना घेऊन पूर्ण देशभर निधी संकलनाचे कार्य जोमात सुरू आहे. या अंतर्गत निधी संकलन करीत असलेल्या राम भक्तांचे घरोघरी पूजन करून स्वागत केले जात आहे. निधी संकलनचे कार्य दोन टप्प्यात सुरू असून १५ ते ३१ जानेवारी हा पहिला टप्पा तर दुसरा टप्पा १ ते १५ फेब्रुवारी असा आहे. रामभक्त कार्यकर्ते नगरात घरोघरी जाऊन निधी संकलनचे कार्य करत आहेत. निधी संकलनाला नगरात भरघोस प्रतिसाद मिळत असून या संकलनकर्त्यांचे पूजन करून स्वागतही केले जात आहे. काही लोक आतुरतेने निधी समर्पण करण्यासाठी कार्यकर्त्यांची वाट बघत असून गरीब व सामान्य वर्ग सुद्धा आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार व स्वेच्छेने निधी समर्पण करत आहेत.
राम मंदिर निधी संकलनकर्त्यांचे घरोघरी पूजन व स्वागत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST