शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील सराईत आरोपींना केली अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

गोंदिया : शहरात चार ठिकाणी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली असून, या गुन्ह्यांचा उलगडा लावला आहे. ...

गोंदिया : शहरात चार ठिकाणी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली असून, या गुन्ह्यांचा उलगडा लावला आहे. तसेच या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरी केलेला माल जप्त केला आहे.

शहरातील कुंभारेनगर निवासी राज सुधीर घरडे २४ जून रोजी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून एलईडी टीव्ही, होम थिएटर स्पीकर्स व रोख १५ हजार रुपये असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा माल लंपास करण्यात आला होता. प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार नोंद असून, त्याचा तपास करीत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल लिलेश्वर पाल ऊर्फ इमरान सलीम शेख (२४, ह.मु. गौतमनगर) याला व अनुज जगदीश चौधरी (१९, रा.सूर्याटोला) यांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता दोघांनी आपला गु्न्हा कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी घरडे यांच्यासह आणखी तीन ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले चार एलईडी टीव्ही, स्पीकर्स, दोन इलेक्ट्रिक मोटार, पितळी व काश्याची भांडी, वजन मशीन, इलेक्ट्रिक शेगडी, सेटटॉप बॉक्स असा एकूण ९८ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.