शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली अर्जुनी नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:45 IST

महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारीसाडी, डोक्यावर ज्योतीकलश, विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लेझीमपथक, हरिपाठ, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविणारे दृश्य सारे विलोभनीय होते.

लोकमत न्यूज नेटवर्कसंत चोखोबानगरी (अर्जुनी मोरगाव) : महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारीसाडी, डोक्यावर ज्योतीकलश, विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लेझीमपथक, हरिपाठ, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविणारे दृश्य सारे विलोभनीय होते. महाराष्ट्राच्या परंपरेतील विविध वेषभूषेने नटलेल्या या आकर्षक ग्रंथदिंडीने अर्जुनीवासीय भारावले. खऱ्या अर्थाने संताच्या पदस्पर्शाने अर्जुनी मोरगाव नगरी पावन झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ही दिंडी अभूतपूर्व अशी होती.सातव्या अखील भारतीय मराठी संत साहितय संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी ७ वाजता दुर्गा चौक येथून ग्रंथदिंडी निघाली. संत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे तसेच ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी सुमारे दोन कि.मी. लांब होती. या दिंडीत जि.प. कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यालय व बहुउद्देशिय हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तुकाराम महाराजांपासून तर गाडगेबाबांपर्यंत सर्व तत्कालीन संताचे आकर्षक देखावा (झाकी) बहुउद्देशिय हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तुकाराम महाराजांपासून तर गाडगेबाबांपर्यंत सर्व तत्कालीन संताचे आकर्षक देखावा (झाकी) बहुउद्देशिय हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारला होता. प्रजापती ईश्वरीय ब्रम्हकुमारी शाखा अर्जुनी मोरगावच्या वतीने आकर्षक शिव-पार्वती देखावा साकारला होता. यासोबतच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानतर्फे उज्वल प्रभाग संघ, श्री संप्रदाय तालुका सेवा समिती, बहुउद्देशिय हायस्कल, केजाजी महाराज हरिपाठ व दिंडी बाराभाटी, गुरुदेव भजन मंडळ सासरा, विठ्ठल परिवार वारकरी संप्रदाय सानगडी, न्यू राम वारकरी दिंडी सामूदायीक मंडळ घाटबोरी/तेली, सार्वजनिक भागवत सप्ताहमंडळ महागाव, पिंपळगाव/खांबी, अर्जुनी मोरगाव तसेच स्थानिक लोकमत सखी मंच या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.तिबेटीयन संस्कृती तसेच गौरननगर, पुष्पनगर व दिनकरनगर येथील बंगाली वसाहतीचे हरी मोहंतो यांच्या सहभागामुळे सर्वधर्म समभावाचे दर्शन या ग्रंथदिंडीतून दिसून आले. अर्जुनी नगरीच्या प्रमुख मार्गाने टाळ, मृदंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी गावकºयांचे लक्ष वेधून घेत होती. अवघडे पंढरपूर येथेच अवतरल्याची प्रचिती येत होती. या ग्रंथदिंडीत एकूण ३७ मंडळ सहभागी झाले होते.ही दिंडी दुर्गा चौक, मुख्य बाजार चौक, जुने बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे कार्यक्रमस्थळी पोहोचली. तेथील प्रवेशद्वारावर दिंडीचे स्वागत व दिंडीत सहभागी झालेल्या संतांना शुभेच्छा देण्यात आल्या. माहेश्वरी मंडळातर्फे दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, महिला व पुरुषांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.संमेलनात राजकीय प्रचारयेथील चोखोबानगरीत आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या सभागृहाबाहेर असलेल्या स्टॉलवरुन राजकीय नेते व पक्षाची निशाणी असलेल्या कॅलेंडरचे वाटप उपस्थितांना केले जात होते. वारकरी साहित्यावर राजकीय वर्चस्व भारी असल्याचे या संमेलनातून दिसून आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संत मंडळींना नाश्ता वाटप करताना नाश्ता संपला. कित्येजण नाश्त्यापाूसन वंचित राहले. भोजनस्थळी पिण्याच्या पाण्याची अपूरी व्यवस्था होती.