शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ देणार दलालांना सुट्टी

By admin | Updated: March 4, 2017 00:12 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना तयार करणे, त्यांचे नुतनीकरण करणे,

सर्व कामे आता आॅनलाईन : चकरा होतील बंद नरेश रहिले   गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना तयार करणे, त्यांचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे, परवाना एकत्रीकरण अशा विविध कामांसाठी पायपीट करणाऱ्या नागरिकांचा आता त्रास वाचणार आहे. घरबसून ही सर्व कामे आॅनलाईन करण्यासाठी ‘सारथी ४.०’ हे नविन व्हर्जन आले असून यातून लोकांचा त्रास कमी होणार आहे. यामुळे आरटीओ कार्यालयात असणाऱ्या दलालांनाही सुट्टी मिळणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ही सर्व कामे आॅफ लाईन होत होती. लर्निंग व नियमीत परवाना तयार करण्यासाठी लोकांना या कार्यालयाच्या चकरा काढाव्या लागत होत्या. चकरा मारून-मारून थकलेल्या लोकांना दलाल गाठत व त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करून त्यांची कामे करीत असत. आता या दलालांपासून सुटका करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व कामे आॅनलाईन पध्दतीने करण्यासाठी ‘सारथी ४.०’ या व्हर्जन मधून काम केले जाणार आहे. नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करणे, शुल्क जमा करणे, कागदपत्र जमा करणे ही सर्व कामे ग्राहक सेवा केंद्रातून करता येईल. आपापल्या कामासाठी आरटीओ कार्यालयात येऊन आरडाओरड करणाऱ्यांना आता कायमची मुक्तता मिळणार आहे. प्रक्रियेची माहिती ग्राहकाला राहील ग्राहकांनी अर्ज केल्यावर त्यांना आयडी नंबर मिळणार आहे. त्या आयडी नंबर वरून त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जावर कुठली प्रक्रिया झाली. आता त्यांचे काम कुठ पर्यंत आले याची इत्थंभूत माहिती अर्जदाराला घरी बसून त्या आयडीवरून पाहता येईल. अर्जात त्रुट्या असल्यास ते अर्ज परत पाठवून त्यातील त्रुट्या दुरूस्त करण्याचा सल्ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी देणार आहेत. त्रुट्या पुर्ण झाल्यावर तो अर्ज पुन्हा या कार्यालयाला पाठविला जाणार आहे. तीन दिवस होणार त्रास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचा कायमचा त्रास कमी करण्यासाठी हे सिस्टम बसविले जात असल्याने ७, ८ व ९ मार्च रोजी ग्राहकांना थोडा त्रास होणार आहे. या तीन दिवशी काम होणार आहेत. परंतु काम संथ गतीने होणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी गोंदियातील आठ ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.