शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सकाळी होळीदहन आणि दुपारी धुळवड

By admin | Updated: March 26, 2016 01:46 IST

यंदाच्या होळी दहन २२ मार्चला की २३ मार्चला याचा संभ्रम शेवटपर्यंत राहिला. सालेकसा तालुक्यात काही गावात ...

कुठे एक दिवस तर कुठे तीन दिवस : एकाच दिवशी दोन्ही उत्सव सालेकसा : यंदाच्या होळी दहन २२ मार्चला की २३ मार्चला याचा संभ्रम शेवटपर्यंत राहिला. सालेकसा तालुक्यात काही गावात २२ ला होळी आणि २३ ला धुळवड साजरी केली. तर काही गावांनी २३ मार्चला सकाळी होळी दहन आणि दुपारी रंगोत्सवाची धुळवड उडविली. तर काही गावांमध्ये २३ मार्चला होळीदहन आणि २४ मार्चला धुळवड साजरी करण्यात आली. त्यामुळे सालेकसा तालुक्यात मिश्र संस्कृतीचा प्रभाव असल्याने यंदा होळीचे रंग वेगळे व बहुरंगी झाल्याचे दृश्य दिसून येत आहेत. परंतु या विषमतेमुळे कामकाज व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अस्वस्थ होण्याचीसुद्धा पाळी आली.सालेकसा तालुका हा तीन राज्याच्या टोकावर असल्याने या तालुक्यावर महाराष्ट्रसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. याचा परिणाम सण, उत्सव साजरा करण्यावर ही पडत असतो. त्यामुळे अनेक बाबतीत विषमता नेहमीच दिसून होते. मराठी कॅलेंडरनुसार यंदा होळी दहन २३ मार्चला आणि २४ मार्चला धुलीवंदन साजरा करण्याची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. परंतु मध्यप्रदेश, छत्तीसगडसह संपूर्ण उत्तर भारतात हिंदी भाषिक राज्यात २२ मार्चलाच होळी दहनची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. सालेकसा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात अनेक गावे मध्यप्रदेशच्या सीमेलगत असल्याने या गावांमध्ये मराठीपेक्षा हिंदीचा जास्त प्रभाव आहे. तसेच छत्तीसगड सिमेलगत छत्तीसगडी आणि हिंदीचा प्रभाव असून या क्षेत्रात छत्तीसगडी व मध्यप्रदेशचे सण उत्सव साजरे होतात. भाषा ही त्यांचीच बोलतात. त्यांना मराठी अवघड वाटते म्हणून अनेक लोक मराठी पेक्षा हिंदीचा जास्त महत्व देतात. दुसरी बाजू असी की हिंदी भाषिक परिसरातील लोकांची सोयरकी मध्यप्रदेशच्या लोकांशी जास्त आहे. त्यामुळे या परिसरात सण उत्सवाच्या समन्वय हिंदी कॅलेंडरनुसार चालते. याचा परिणाम असा झाला की यंदा सालेकसा तालुक्यात झालीया, कोटजमुरा, सोनपुरी, पिपरीया आदी गावात २२ मार्चला सायंकाळी होळी दहन आणि २३ ला रंगोत्सव साजरा करण्यात आला. मध्यभागात काही गावात हिंदी, मराठी दोन्ही प्रकारचे लोक वास्तव्यास असल्याने काही ठिकाणी एकाच गावात एकीकडे २२ ला तर दुसऱ्या भागात २३ ला होळी दहन करण्यात आले. काही गावात २३ लाच सकाळी होळीदहन आणि त्याच दिवशी दुपारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. मराठी भाषीक गावांमध्ये २३ मार्चला होळी दहन आणि २४ मार्चला धुळवड साजरी झाली आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यात यंदा तीन दिवस होळी उत्सव साजरा करण्यात आला. होळीचा उत्सव फागून महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो. यंदा पौर्णिमेचा काळ २३ लाख दुपारी ५.३० वाजतापर्यंत असल्याने हिंदी भाषिकांनी चतुर्दशी पौर्णिमेलाच होळी दहन करण्याचे ठरविले. परंतु मराठी कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा २३ ला होळी दहन दाखविण्यात आला आहे. २३ ला छाया कल्प चंद्रग्रहण असून तो सायंकाळी ७.२५ पर्यंत राहणार असल्याचे कॅलेंडरमध्ये आहे. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाला. परंतु हे चंद्रग्रहण नुकसान कारक नसून धार्मिक उत्सव साजरा करण्यात अडचण नसते. असे मत काही ज्योतिषाचे असल्याने यंदा होळी दहन एकच दिवशी आली नाही. (तालुका प्रतिनिधी)