शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी पर्यावरणपूरक होळी

By admin | Updated: March 15, 2017 01:03 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी केरकचरा जाळण्यात आला.

आरएफओ रहांगडाले : पर्यावरणासाठी वृक्षसंगोपनाचे आवाहन बोंडगावदेवी/सालेकसा : जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी केरकचरा जाळण्यात आला. लाकूडमुक्त होळी जाळून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. आज मानवी जीवनाला शुद्ध हवा व पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलामध्ये झाडे राहणे काळाची गरज आहे. उत्सवाच्या निमित्ताने लाकडांची राखरांगोळी होऊ नये यासाठी गावातील सुज्ञ नागरिकांनी जागरूक राहून पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी लाकूडविरहित पर्यावरणपूरक होळीचे दहन करून प्रदूषण विरहीत वातावरण निर्मितीसाठी ग्रामस्थांनी पुढे यावे. निसर्गनिर्मित वृक्षसंगोपन पर्यावरणासाठी हितकारक असल्याचे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी केले. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय तसेच स्थानिक क्षेत्र सहाय्यक, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने येथे पर्यावरणपुरक होळीचे दहन करताना ते ग्रामस्थांशी हितगुज साधताना बोलत होते. वनविभागाच्या अर्जुनी-मोरगाव, गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने बोंडगावदेवी, इसापूर, वडेगाव याठिकाणी पर्यावरणपुरक होळी दहन कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, क्षेत्र सहायक धुर्वे, बी.डी. दखने, सरपंच राधेश्याम झोळे, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. श्यामकांत नेवारे, बीट अंमलदार सोनवाने, तंमुस अध्यक्ष तुुळशीदास बोरकर, बीटरक्षक पी.टी. दहीवले, एस.एन. पंधरे, जयश्री राजगिरे, रिना लांजेवार, सीमा सूर्यवंशी, डी.सी. बरडे, पी.जी. भुरे, नित्यानंद पालीवाल, कुंडलिक मानकर, दयाराम महाराज बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी आरएफओ रहांगडाले म्हणाले, पालापाचोळ्यासह पर्यावरणपुरक होळीचे दहन केल्यास लाकडे वाचविता येतात. वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढे यावे. सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लाकडे जाळण्याचा कयास कमी करावा. जंगले जंगली तरच माणवाला शुध्द हवा, पोषण असा वातावरणाचा आस्वाद घेता येईल. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी लाकूविरहीत होळी दहन करण्याची तत्परता ग्रामस्थांनी दाखवावी. निसर्गाच्या सान्निध्यातील वातावरण माणवाच्या शरीराला लाभदायक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लाकूडमुक्त होळी सालेकसा : येथील प्रेरणा मित्र परिवाराच्या वतीने मुख्य चौकात लाकूडमुक्त होळी साजरी करण्यात आली. यात सालेकसा शहर वासीयांनी उंदड प्रतिसाद देत सहभाग नोंदवला व पर्यावरणाच्या रक्षणार्थ लाकूडमुक्त होळी काळाची गरज आहे, याची सगळ्यांना जाणीव करून दिली. प्रेरणा मित्र परिवारातील सक्रिय कार्यकर्ते मधू हरिणखेडे, निलेश बोहरे, गणेश भदाडे, विजय मानकर, यशवंत शेंडे, सुरेंद्र बिसेन, राहुल हटवार यांच्या पुढाकाराने शहरात लाकूडमुक्त होळी साजरी करण्याच्या निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व सदस्यांनी आपली सहमती दाखविली व लाकूडमुक्त होळी साजरी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावत तयारी केली. १२ मार्चला होळी दहनाचा मूहूर्त साधत सायंकाळी ७ वाजता सालेकसा येथील मुख्य चौकात गावातील केरकचरा, रद्दी कागद, दुकानातील व आॅफीसमधील टाकाऊ पदार्थ, बेकार कागदे इत्यादी एकत्रित करुन ढीग तयार करण्यात आले. त्याचबरोबर होळी दहनानिमित्त वाईट सवयींचा त्याग करण्याचा संकल्प घेत बिडी, तंबाखू, दारु, गुटखा इत्यादींचे फलक तयार करून होळी दहनासह त्या फलकांचेही दहन करण्यात आले. होळी दहन करण्यापूर्वी होलीका पूजन करून एकमेकांनी गुलाल लावून गळाभेट घेतली. विधीवत पूजन करुन सर्वांच्या हाती मेणबत्या देऊन होळी दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेनेते सोहन क्षीरसागर, कुलतारसिंह भाटीया, प्रकाश टेंभरे, मनोज शरणागत, नेपाल पटले, से.नि. तलाठी साखरे यांच्यासह शहरातील अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते. होळी दहन करून होळीची परिक्रमा करीत हरहर महादेव, हर बोला हर हर महादेवाचा उद्घोष करण्यात आला. तसेच वाईट सवई सोडण्याचा सुध्दा उदघोष करीत संकल्प करण्यात आला. कार्यक्रमासाठी संजय बारसे, प्रमेश बिसेन, कमलेश साठवणे, पवन पाथोडे, राकेश रोकडे, दीपक ठाकरे, दिनेश कवरे, बृजभूषण बैस, शैलेष बहेकार, त्रिरत्न लोणारे, गोविंद पटले, मिलींद चौधरी, हरिष पटले, सतीश अग्रवाल, कृष्णा मेंढे, भूपेश फुंडे, विजय फुंडे, सुदेश जनबंधू, राजेंद्र बिसेन आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)