गोंदिया : होळीचा सण बघता पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांना दणका देत पोलिसांनी ‘वॉश आउट’ मोहीम राबवित शनिवारी (दि. २७) ७ अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला. पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांकडून पाच हजार ७७२ रुपयांची दारू जप्त केली आहे.
या कारवायांतर्गत, पोलिसांनी ग्राम लोहारा येथील सुरेंद्र देवेंद्रसिंग देसाई (रा.सुरतोली) यांच्या पानटपरीत धाड घालून दोन हजार ८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४० बॉटल्स, प्रमोद बीरसिंग परिहार (४८, रा.सुरतोली) याच्या लोहारा येथील पानटपरीत धाड घालून ८८४ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १७ बॉटल्स, हरेंद्र हिरामन बनसोड (४२, रा.मसरामटोला) यांच्या पानटपरीत धाड घालून २६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५ बॉटल्स, केवळराम कारू ठलाल (६०, रा.बाघनदी) याच्याकडे असलेल्या थैलीतून ७२८ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १४ बॉटल्स, नरेंद्र रामकिशन टेंभूरकर (४५, रा.शेडेपार) यांच्या घरातून ९८८ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १९ बॉटल्स जप्त केल्या.
तसेच अरुणा बालय्या परकेवार (४३, रा. पुतळी) हिच्या घरावर धाड घालून ५२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० बॉटल्स व राजेश श्रीराम कोचे (३९, रा. नैनपूर) याच्या घरातून ३१२ रुपये किमतीच्या देशी दारूच्या सहा बॉटल्स जप्त केल्या. या आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिंगनजुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक उरकुडे, हवालदार मडावी, तिरपुडे, नायक देसाई, बोहरे, करंडेकर, न्यायमूर्ती, उईके, भांडारकर, हातझाडे, बोपचे, शिपाई चव्हाण, नेवारे, महिला शिपाई सोनजाल, सोनवाने, पटले, निखाडे, राऊत यांनी केली.