शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावलेल्या 50 जणांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत.

ठळक मुद्दे तिरोडा पोलिसांची धडक कारवाई : विशेष मोहिमेत पाच हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर जोर दिला जात आहे. स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निरंतर माहिती पोलीस प्रशासन आठवडी बाजारात  देत आहे. परंतु याकडे शहरातील नागरिक डोळेझाक करून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशात आता तिरोडा पोलीस पुन्हा कंबर कसून मैदानात उतरले असून रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मोहीम राबवून ५० जणांना दंड ठोठावला आहे. कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. शहरातही नागरिक मास्क व लावता फिरत असून ठिकठिकाणी कोरोनाला न घाबरता गर्दी केली जात आहे. हा प्रकार धोकादायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही निर्बंध लावले असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. याकडे लक्ष देत व शहरातील नागरिकांची बेपर्वाई बघून पोलिसांनी रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मास्क न लावलेल्यांना दणका देण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये पोलिसांनी या एका तासात ५० जणांना पकडले असून त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये नुसार पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, आता गोंदिया शहरातही मास्क न लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली जात असून अवघ्या जिल्ह्यातच कठोरतेने ही मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. अशात आता ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर निघताना मास्क घालूनच घराबाहेर निघावे, शारीरिक अंतराचे पालन करावे व व्यापारी बांधवांनी सुद्धा मास्क घालून प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी कळविले आहे. 

पोलीस ठाण्यात बसवून ठेवले पोलिसांनी या मोहिमेंतर्गत मास्क न लावणाऱ्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले व मैदानात बसवून ठेवले. याप्रसंगी त्यांना मास्क न लावण्यापासून होणारा धोका काय हे समजावून सांगण्यात आले. तसेच एक-एक करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आले. तिरोडा पोलिसांच्या या प्रयोगाने शहरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, तिरोडा तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. अशात नागरिकांनी अधिकच सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या