शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

Lok Sabha Election 2019; लोकसभेच्या रिंगणात उच्चशिक्षित उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया मतदारसंघ : सर्वात तरुण उमेदवार २९ वर्षाचा तर वयस्क ६८ वर्षांचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे.राजकीय क्षेत्रात कॅरीअर घडविणारे कमीच. नेत्यांच्या मागे लागून काहीतरी फलीत होईल असे नेहमी कार्यकर्त्यांना वाटत असते. मात्र ऐन निवडणुकीत उभे राहणारे व विचार करणारे वेगळेच असतात. त्यातही शिक्षित व अल्पशिक्षीतांचा भरणा असतो. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. १४ पैकी ११ उमेदवार उच्चशिक्षित आहेत. या निवडणुकीत उच्च शिक्षितांनी आपले कौशल्य पणाला लावले असून आता मतदार कुणा उच्चशिक्षिताला लोकसभेत पाठवितात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यंदा मतदारांना उच्चशिक्षित उमेदवार मिळाले आहेत. मात्र राजकारणाच्या अखाड्यात हे उच्चशिक्षित उमेदवार आपली बुध्दी कशी पणाला लावतात आणि मतदारांना कसे आकर्षित करतात हे महत्वाचे आहे.कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअरभंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात उमेदवार म्हणून उभे असलेल्यापैकी कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर आहे. विशेष म्हणजे यापैकी दोन उमेदवार सेवानिवृत्त कर्मचारी असून उच्च शिक्षीत आहेत. सात उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. तीन उमेदवार पेशाने अभियंते आहेत. दोन उमेदवार विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत. यापैकी दोनच उमेदवार अल्प शिक्षीत असून एक बारावी तर एक नववी उत्तीर्ण आहे.वयाची पन्नाशी गाठलेले आठ उमेदवारनिवडणुक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशिल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापैकी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या रणसंग्रामात १४ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यापैकी सर्वात तरुण उमेदवार हा २९ वर्षांचा आहे. वयस्क उमेदवार हे ६८ वर्षांचे आहे. काही निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे.