शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच मुलाला विष पाजले, एका महिलेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 02:18 IST

अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला.

गोंदिया : अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला. मृत मुलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.विनय ललेश लिल्हारे (१५) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. १४ आॅगस्टच्या रात्री सुनीता महेश लिल्हारे (३५) हिच्या घरी विनयच्या गाईचे वासरू शिरले होते. त्याला पकडण्यासाठी तो गेला असता, सुनीता व ब्रिजेश कवडू लिल्हारे या दोघांना त्याने नको त्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे गावात आपली बदनामी होईल, या भीतीने कवडू सोनू दमाहे (३५) याच्या मदतीने सुनीता आणि ब्रिजेशने विनयला पकडून मारहाण केली व त्याला उंदीर मारण्याचे औषध पाजले.विनयचा भाऊ अनिकेत (१४) याने हा सर्व प्रकार पाहिला. मात्र, त्यालाही या तिघांनी याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तथापि, या घटनेची माहिती मिळाल्यावर, गावकºयांनी विनयला गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी विनयचा मृत्यू झाला. अनिकेत याच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी खून व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून, सुनीता, ब्रिजेश व कवडू या तिघांना अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत़ आरोपींनी वापरलेले उंदीर मारण्याचे औषध कोठून आणले़ त्यांना ते कोणी दिले, याचा तपास पोलीस करणार आहेत़