शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाऱ्यावरच ; रिक्षा चालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल ...

गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल व डिझेल दरवाढीने केले आहे. त्यातच पुन्हा दुसरे लॉकडाऊन झाल्याने ऑटो चालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारने ऑटो चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १८२० रिक्षा चालकांना कवडीचीही मदत मिळाली नाही. कोरोनामुळे एकमेकांच्या जवळ येऊ नका, दाटीवाटीने प्रवास करू नका, अशा सूचना प्रशासनाने दिल्यामुळे ऑटो व्यावसायिक संकटात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसरे लॉकडाऊन करण्यात आले अन्‌ ऑटो बंद झाले. शासनाकडून मदत देण्याची घोषणा केली पण मदत मिळालीच नाही.

..............

रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया

कोरोनाच्या संसर्गामुळे लोक अधिक पैसे खर्च करून स्वत:च्या वाहनाने प्रवास करू लागले. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आमचा रोजगार संपला. शासनाने ऑटो चालकांना मदत करण्याची घोषणा केली परंतु आतापर्यंत आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही.

नंदू लांजेवार, ऑटोचालक खमारी

....

कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोमाने सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या रोजगारावर संकट आले. आधी आमची रोजी-रोटी चांगली सुरू होती. परंतु आता ऑटो रिक्षाकडे ग्राहकच भटकत नाहीत. आम्हाला आता रिक्षा बंद करावा लागला. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाची मदत अद्याप मिळाली नाही.

-सतीश समुद्रे

अध्यक्ष, ऑटो रिक्षाचालक संघटना

.....

पहिल्या लॉकडाऊननंतर बहुतांश रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या नाहीच्या तुलनेत होती त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही धंदा मंदच होता आता पुन्हा ऑटो बंद झाल्याने पोट कसे भरणार? मदत देण्याची घोषणा केली परंतु ही घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.

-राजेश ठाकूर, रिक्षा चालक

.........

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा- १८२०

परवाना नसलेले रिक्षाचालक-१५०