शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:57 IST

पाणी आणि कोळश्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात वीजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या ओळखत वीज निर्मितीसाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देगोंदियातील शिक्षकाचा प्रयोग : अपघात टाळण्यास होणार मदत

आॅनलाईन लोकमतगोंदिया : पाणी आणि कोळश्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात वीजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या ओळखत वीज निर्मितीसाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया येथील एका शिक्षकांने चक्क हॉयवेवरील स्पीड ब्रेकरच्या सहाय्याने वीज निर्मिती करणे शक्य असल्याचा प्रयोग तयार केला आहे. सध्या हा प्रयोग जिल्हावासीयांसाठी चांगलाच कुतुहलाचा विषय ठरत आहे.प्रतिक चिंतामन वालदे रा.गोंदिया असे त्या प्रयोगशिल शिक्षकाचे नाव आहे. वालदे हे गोंदिया मुर्री येथील चंद्रभागा हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत आहे. मागील सहा सात वर्षांपासून इन्स्पायर अर्वाड विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन विविध शाळांमध्ये केले जात आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वालदे यांनी विज्ञान प्रदर्शनीकरिता एक अभिनव प्रयोग करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी पत्नी स्वाती आणि त्यांच्या मित्रांची मदत घेत हॉयवेवरील मुव्हेबल स्पीड ब्रेकरच्या मदतीने वीज निर्मितीचा प्रयोग तयार केला. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांच्या वेगाला मर्यादा लावण्याकरिता महामार्गावर स्पीड ब्रेककर तयार केले जातात. मात्र हे स्पीडब्रेकर जर मुव्हेबल असल्यास या स्पीड ब्रेकवरून वाहन गेल्यानंतर त्याच्या दाबापासून वीज निर्मिती करणे शक्य आहे. त्यांनी या प्रयोगाला ‘हॉयवे इलेक्ट्रीकसिटी जनरेटर’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे याच प्रयोगाच्या मदतीने पवन ऊर्जा निर्मिती देखील शक्य आहे. हॉयवेवरुन दररोज शेकडो वाहने धावतात. या वाहनाच्या गतीने निघाºया वाºयाव्दारे पवन ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे. हे स्पीड ब्रेकर मुव्हेबल असल्याने अपघात टाळण्यास देखील त्याची मदत होणार असल्याचा दावा वालदे यांनी केला आहे. हा प्रयोग कोणत्याही महामार्गावर राबविता येणे शक्य आहे. यासाठी येणार खर्च देखील फार कमी असून यातून भविष्यातील विजेच्या समस्येवर मात करणे शक्य असल्याचे वालदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.प्रयोगासाठी वापरलेले साहित्यवालदे यांनी स्पीड ब्रेकरच्या मदतीने वीज निर्मितीचा प्रयोग सादर करण्यासाठी प्लॉयवूड, लाकडी बीट, सीडी लोडर, डिसी मीटर, प्लास्टीक पाईपचा तुकडा आदी साहित्याचा उपयोग केला.अशी होईल वीज निर्मितीहॉयवे वरुन दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर मुव्हेबल स्पीड ब्रेकर तयार करायचे, या स्पीड ब्रेकवरुन वाहन जाताच त्याच्या दाबामुळे त्याच्याखाली लावलेली मोटार तेवढ्याच वेगाने फिरले, त्याच्या घर्षणापासून निर्माण होणाऱ्या उर्जेचे वीजेत रुपांतर होईल. शिवाय स्पीड ब्रेकर मुव्हेबल असल्याने ब्रेक दाबल्यानंतर लागत असलेल्या इंधनाची बचत करणे सुध्दा शक्य होणार असल्याचा दावा वालदे यांनी केला आहे.हे आहेत फायदेविना इंधन विजेची निर्मिती, दचके मुक्त ब्रेकरमुळे अपघात टाळण्यास मदत, वाहनाच्या गतीने निघणाऱ्या वाऱ्याव्दारे पवन ऊर्जेची निर्मिती शक्य. विजेच्या समस्येवर मात करणे शक्य, कोणत्याही महामार्गावर लावणे शक्य आदी फायदे आहेत.