शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 21:32 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत व धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रात राज्य सरकारकडे केली आहे.

ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांची विधानसभेत मागणी : ५०० रूपये बोनस व पीक विम्याचा मुद्दा उचलला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत व धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रात राज्य सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी त्यांनी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा मुद्दाही उचलून धरला.विधानसभेच्या हिवाळी सत्रात आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती मांडत सरकारला चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, कृषी उत्पादनाच्या खर्चावर ५० टक्के नफा जोडून आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन देऊन सन २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. मात्र सत्तेत आल्यानंतर याच सरकारने शेतकऱ्यांना जास्त त्रास दिला.आता जिल्ह्यात पावसाअभावी खरीपाचा हंगाम हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशात शेतकºयांना हेक्टरी ५०० रूपये बोनस देण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्याची आनेवारी ५ टक्के पेक्षा कमी असूनही कृषी विभाग ५० टक्के पेक्षाही कमी आनेवारीच्या हिशोबाने घेत आहे. अशात १० हजार रूपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी विधानसभेत पुरजोरपणे उचलून धरली.याशिवाय पीक विम्याचा मुद्दा मांडत सरकारने शेतकऱ्यांकडून पीक विम्याच्या नावावर ७०० रूपये विमा शुल्क वसुल केले. मात्र नुकसानाची पाहणी करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी आले नाही.अशात विमा कंपनीने त्वरीत गावांचा दौरा करून शेतकºयांना पीक विम्याबाबत वर्तमान स्थितीची माहिती देत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत रकमेचे वितरण करावे अशी मागणी केली.दुष्काळी परिस्थितीच्या उपाययोजना लागू करासरकारने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना मध्यम दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र यातून शेतकºयांना काही भक्कम मदत मिळणार नाही. यामुळे पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित क रून शासकीय नियमानुसार दुष्काळग्रस्त जिल्ह्याला देण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना लागू करण्याची मागणी याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वच विषयांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन याच सत्रात आवश्यक ते निर्णय घेऊन घोषणा करण्याचे आश्वासन दिले.- सरसकट कर्जमाफी द्याआमदार अग्रवाल यांनी, कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत गोंदिया जिल्ह्यात दोन लाख पेक्षा जास्त शेतकरी असून ते कर्जदार आहेत. मात्र सरकारने ४६ हजार शेतकऱ्यांनाच पात्र घोषीत करीत ग्रीन यादीत टाकले आहे. असे करून सरकार पात्र व अपात्र शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना तोडण्याचे कार्य करीत असल्याचेही मत सर्वांसमक्ष मांडले. जर सरकार खरोखरच शेतकऱ्यांची हितेशी असेल तर सन २००८-०९ मध्ये सोनिया गांधी यांच्या निर्देशावर केंद्रातील मनमोहन सिंह यांच्या सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. त्याचप्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल