शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

By admin | Updated: July 31, 2016 00:21 IST

आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत गेल्यावर्षीच्या दुष्काळग्रस्त ८४ गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत

संजय पुराम : सभागृहात केली मागणी देवरी : आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत गेल्यावर्षीच्या दुष्काळग्रस्त ८४ गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी आ. संजय पुराम यांनी विधानसभेत केली. विशेष म्हणजे मागील वर्षी पावसाअभावी आमगाव विधानसभा क्षेत्रातील ८४ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. त्या गावांना शासनाने अद्याप कोणतीच मदत दिली नाही. पिक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वरुन आता खरीप हंगामाची सुरुवात झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने तो ते दररोज बँकेच्या चकरा मारत आहेत. बँकांच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या दिलासा देण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. शासनाकडून मदत व पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचे प्रधान सचिव यांना पत्र दिले. यावर शासनाची मदत लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ.पुराम यांनी कळविले. गेल्यावर्षी जिल्ह्यात देवरी तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे खरीपच नाही तर रबी हंगामातही शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. तरीही त्यांना मदत मिळाली नाही.