शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

रुग्णालयातच रुग्ण भोगताहेत नरक यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. येथील चार वार्ड बंद करून सध्या एकाच वॉर्डातून काम सुरू असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडाला आहे.

ठळक मुद्देसर्व रूग्ण एकाच वार्डात । चार वार्ड बंद करून एकाच वार्डात रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजारी पडल्यानंतर रुग्णाला बरे होण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे उपचार करुन रुग्ण बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सध्या स्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले जाणारे रुग्ण बरे होवून परतण्याऐवजी त्यांना तेथील गैरसोयीमुळे नरक यातना भोगाव्या लागत आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी तो अधिक आजारी होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. येथील चार वार्ड बंद करून सध्या एकाच वॉर्डातून काम सुरू असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. परंतु हे वैद्यकीय महाविद्यालय आधीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या तुलनेत सेवा देण्यास मागे पडत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांना सेवा देण्यासाठी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील चार वार्ड खाली करण्यात आले. त्या वार्डात बेड, व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली. परंतु कोविड रूग्णांना या वैद्यकीय महाविद्यालयात ठेवले जात नाही. कोविड रूग्णांना जिल्हा क्रीडा संकुल, एम.एस.आयुर्वेदीक महाविद्यालय येथे ठेवले जाते. कोविड रूग्णांना ठेवलेही जात नाही आणि ते वॉर्ड सर्वसामान्य रूग्णांसाठी मोकळेही केले जात नाही. विविध आजाराचे रूग्ण, विष प्राशन केलेले, जळीत, अपघात झालेले, रक्ताक्षय किंवा कोणत्याही प्रकारचा आजार घेऊन आलेल्या रूग्णांना वार्ड क्रमांक पाच येथे एकाच वॉर्डात ठेवले जात आहे.एका वार्डात जागा नसल्याने रूग्णांना खाली झोपविले जात आहे. पावसाळ्याचे दिवस व कोरोनाची साथ असतानाही या वैद्यकीय महाविद्यालत वॉर्ड क्रमांक पाचमध्ये पाहिजे तशी स्वच्छता नाही. जिल्ह्यातील गोरगरीबांना या वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिली जात नाही.रुग्णालयातच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाकोरोनावर मात करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. परंतु याच आरोग्य विभागात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडविला जात आहे. एकाच वार्डात मोठी गर्दी दररोज पाहायला दिसते. या वॉर्डात सुरक्षित अंतर दिसतच नाही.शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीखया एकाच वार्डातून व एकाच ओटीतून काम होत असल्यामुळे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीख दिली जाते.बड्या लोकांसोबत ओळख असलेल्या लोकांचे काम येथे वशीला लावून केले जाते.परंतु गोरगरीबांना फक्त तारीख पे तारीख मिळत असल्याने त्यांना वेदना सहन केल्याशिवाय पर्याय नाही. या प्रकराकडे लक्ष देण्याची गरज आहे.धोका कोरोनाचा नाही जीवाचाकोरोना विषाणूचा धोका मोठा आहे, असे आरोग्य विभाग म्हणते परंतु ज्या रूग्णांचा उपचार होत नाही त्यांना कोरोनाचा धोका कमी आणि असलेल्या आजाराचा धोका अधिक वाटतो. कोरोनाच्या नावावर डॉक्टरांचे वेळ मारू धोरण, त्यात काम न करता रुग्णांनाच धमकाविण्याचे काम येथे केले जाते. परंतु आपला उपचार करणार नाहीत या भीतीपोटी डॉक्टरांना काही म्हणायला रूग्णांचे नातेवाईक धजावत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल