शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी; नवेगावबांध, बेवारटोला ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:28 IST

गोंदिया जिल्ह्यात मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देपुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुरूवारपासूनच पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले भरुन वाहत आहेत. तर आमगाव-देवरी, ओवारीटोला-गोटाबोडी, पांढरवानी-कन्हाळगाव , रोपा-पालांदूर, परसोडी-आलेवाडा, मोहगाव-गडेगाव, शिलापूर-फुक्टीमेटा, अंभोरा-निलज हे मार्ग बंद झाले होते. सालेकसा तालुक्यातील दरेकसा-डहाराटोला व बंजारीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.

संततधार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे १२ आणि कालीसरार धरणाचे चार दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले होते. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशय आणि सालेकसा तालुक्यातील बेवारटोला शंभर टक्के भरल्याने ओव्हर फ्लो झाले होते. पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :floodपूर