शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात अतिवृष्टी! पूराच्या पाण्यात युवक बाईकसह वाहून गेला; अनेक वस्त्या पाण्याखाली

By अंकुश गुंडावार | Updated: September 21, 2022 09:17 IST

आपत्ती निवारण पथकाला माहिती होताच सकाळपासून शोध बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

गोंदिया - जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री 8 वाजेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. लहानमोठ्या नाल्यांना पूर आलेला आहे.त्यातच गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ते घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारच्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास  गेलेला न्यु लक्ष्मीनगर लोहीया वार्ड येथील रणजीतसिंग प्रीतमसिंग गिल वय 21 वर्ष पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बाईकसह वाहून गेला आहे.

आपत्ती निवारण पथकाला माहिती होताच सकाळपासून शोध बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.राणी अंवतीबाई चौकात पुराचे पाणी 2-4 फुट रस्त्यावर असल्याने दुकानात पाणी शिरले.त्यातच रस्ता बांधकामामुळेही वाहनचालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्यानेच ट्रक सुध्दा पलटला गेला आहे.कुडवा नाका परिसरात सुध्दा पाणी साचले आहे.तर अंडरग्राऊंडमध्ये सुध्दा पाणी भरल्याने वाहतुक विस्कळीत झालेली आहे.

अनेक वस्त्या पाण्याखाली

शहरातील रामनगर, मनोहर काँलनी, परमात्मा एक नगर, रिंग रोड या परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील ये जा बंद झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर पुजारीटोला, सिरपूरबांध या धरणांचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे शहरातील काही शाळांनी सुट्टी दिली आहे. 

टॅग्स :floodपूर