शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:16 IST

हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.

ठळक मुद्देधरणाचे दरवाजे उघडले : पावसाची रिपरिप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.मागील २४ तासात सरासरी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने सोमवारी (दि.२७) सकाळी पुजारीटोला प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. तर धापेवाडा प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहे.दरम्यान हवामान विभागाच्या इशाºयानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.दरम्यान पावसामुळे धानपिकांना सुध्दा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.