शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा बालकांवर होणार हृदयशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:29 IST

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिर घेण्यात आले. यात सहा बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले.

ठळक मुद्देतिरोडा उपजिल्हा रूग्णालय : १५२ बालकांची विशेष शिबिरात तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिर घेण्यात आले. यात सहा बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर आता मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या बालकांच्या आरोग्य शिबिरात तिरोडा शहर व ग्रामीण भागातून शेकडो बालके तपासणीसाठी आले होते. यात विविध शाखांमार्फत १५२ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात काही बालकांना हृदयरोग व इतर आजार असल्याचे आढळले. उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय चमूसह गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहा तज्ज्ञांची वैद्यकीय चमू बालकांच्या तपासणीसाठी उपस्थित होती.शिबिरात १० बालकांची हृदयरोग तपासणी, सहा बालकांची कान, नाक व घसा तपासणी, ३० बालकांची सामन्य तपासणी, ३२ बालकांची नेत्र तपासणी, १५ मुलींची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, २१ बालरूग्ण तपासणी, १८ बालकांची दंत तपासणी, १० बालकांची अस्थीरोग तपासणी व १० बालकांची शस्त्रक्रियेसाठी तपासणी विविध तज्ज्ञांकडून करण्यात आली. यातील सहा बालकांची निवड हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांनी सांगितले.बालकांची तपासणी करणाºया तज्ज्ञ चमूमध्ये अस्थिव्यंगरोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर मोहन, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. संजय भगत, बालरोग तज्ज्ञ डॉ. रेखा दुबे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अनिल आटे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भारती रंगारी, नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. राऊत, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. खंडाईत, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुंभलकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. आशिष लोथे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल डगवार यांचा समावेश होता.बालकांच्या तपासणीपूर्वी डॉ. खंडाईत व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांनी बालक, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी घाबरणाºया पालकांना समुपदेशन केले. तपासणीसाठी डॉ. निलेश लोथे, डॉ. प्रणव डोंगरे, डॉ. प्रिया ताजने, डॉ. श्रद्धांजली चौधरी, डॉ. आशिष बन्सोड, समुपदेशक गणेश तायडे, गुरूदास गिरीपुंजे, दीपक रणदिवे, कमलेश शुक्ला, सीमा पेरे, माया पटले, वंदना गौतम यांनी सहकार्य केले.शस्त्रक्रियेची भीती केली दूरतिरोडा उपजिल्हा रूग्णालयात केलेल्या तपासणीत सहा बालकांना हृदयरोग असल्याचे आढळले. या वेळी डॉक्टरांनी बालकांच्या पालकांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र त्यासाठी बालकांसह पालकही घाबरले होते. भीतीपोटी पालकांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला होता. यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आयसीटीसीचे समुपदेशक गणेश तायडे व आरबीएसकेचे समन्वयक संजय बिसेन यांनी समुपदेशन केल्यानंतर सहा बालक व त्यांचे पालक हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी तयार झाले.