शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

धावत्या स्कूल बसच्या चालकाला ‘हार्टअटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:36 IST

धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोसह तीन दुचाकींना बसने धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.

ठळक मुद्देचार वाहनांना दिली धडक : विद्यार्थी थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोसह तीन दुचाकींना बसने धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नसून बसमधील विद्यार्थी देखील थोडक्यात बचावले.वल्लभ जयस्वाल (५८) असे स्कूल बस चालकाचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चालकाला त्वरीत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधीेल सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले.प्राप्त माहितीनुसार, हिवरा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस (एमएच ३५-के ३७२६) गुरूवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी गणेशनगरकडे जात होती. या बसमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. यापैकी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर उर्वरित सहा विद्यार्थ्याना सोडण्यासाठी ही बस गणेशनगर जात होती. दरम्यान या स्कूल बसच्या चालकाने जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाण्यासाठी वळण घेतले असता बस चालक वल्लभ जयस्वाल यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे बसवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोला धडक दिली. त्यानंतर बस नियंत्रीत करण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत असलेल्या एक पानठेला आणि तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले तर एक मोटार सायकल या स्कूल बसच्या चाकात अडकल्याने ती काही अंतरावर फरफटत गेली. हीच दुचाकी बसच्या सामोरील चाकात फसल्याने बस थांबली.या मार्गावर एलएआयसी आॅफीस, बँका आणि रुग्णालय असल्याने या मार्गावर सतत नागरिकांची वर्दळ असते. गुरूवारी दुपारी जयस्तंभ चौक ते गणेशनगर मार्गवरील बसचा हा थरार अनेकांनी अनुभवला. तसेच सुदैवाने थोडक्यात बचावलो अशीच प्रतिक्रीया दिली. दरम्यान एलआयसी आॅफीस आणि पेट्रोलपंप जवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत विद्यार्थ्यांना स्कूलमधून बाहेर काढले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. बस चालकाला ह्दययविकाराचा झटका आल्यानेच हा अपघात घडल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान या घटनेचीे नोंद शहर पोलिसांनी केली आहे.अर्धा तास उशिराने पोहचले पोलीसजयस्तंभ चौकापासून काहीच अंतरावर स्कूल बसचा अपघात झाला. चौकातील व आजुबाजुला उभ्या असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मात्र पोलीस ही घटना घडल्यानंतर तब्बल अर्धातास उशीराने पोहचले. विशेष म्हणजे, सतत वर्दळ असलेल्या जयस्तंभ चौकात सुद्धा वाहतुक नियंत्रक पोलीस शिपाई उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केला.स्कूल बसेसच्या ‘फिटनेसवर’ पुन्हा प्रश्नचिन्हमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नुकतेच स्कूल बसेसच्या ‘फिटनेस’ आणि सुरक्षेवरुन शाळा संचालकांना फटकारले होते. तसेच स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले. त्यानंतर स्कूल बस अपघाताच्या घटना घडत असल्याने स्कूल बसेसच्या ‘फिटनेस’वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.