शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:01 IST

आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज आहे. देश आणि समाजासाठी प्रत्त्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश आणि समाज तंदूरुस्त राहिल. त्यासाठीच प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रजेगाव येथे रोगनिदान शिबिर, पाचशे रुग्णांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज आहे. देश आणि समाजासाठी प्रत्त्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश आणि समाज तंदूरुस्त राहिल. त्यासाठीच प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न आहे. याच दृष्टिकोनातून गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेत समावेश करण्यात आल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील रजेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर व येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेच्या सेवेला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, विजय लोणारे, रजनी गौतम, प्रकाश डहाट, प्रमिला करचाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम.चौरागडे, गमचंद तुरकर, टेकचंद सिंहारे, अंकेश हरिणखेडे, जे.सी.तुरकर, सूर्यप्रकाश भगत, नरेंद्र चिखलोंढे, ईश्वर पटले, किशोर वासनिक, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, अनिल नागपुरे, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, सुरज खोटोले, संतोष घरसेले, टिकाराम भाजीपाले, सावलराम महारवाडे, अशोक मेंढे, रघुजी येरणे,भाऊदास येरणे, सुरेश उपवंशी, देवेंद्र मानकर, जाकीर खान, सचिन डोंगरे, श्याम कावरे, तपेश सोनवाने उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले गोंदिया तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १०८ रुग्णवाहिकेची सेवा, ५६ आरोग्य उपकेंद्रामध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील सिवनी, लोहारा, तुमखेडा खुर्द, फुलचूरपेठ, बाजारटोला, पिंडकेपार, घिवारी, चांदनीटोला, खळबंदा, मोगर्रा येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच या ठिकाणी ही आरोग्य उपकेंद्र सुरू केली जातील असे सांगितले. रमेश अंबुले म्हणाले, आ.गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून तालुक्यात सर्वच क्षेत्रात विकास कामे सुरू असून त्यामुळेच या परिसराचा कायापालट झाल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालHealthआरोग्य