शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा सलाईनवर

By admin | Updated: September 10, 2015 02:13 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा-जमी, कोसमतोंडी व परसोडी या तीन गावांतील आरोग्य विभागाचे उपकेंद्र आता कंत्राटी आरोग्य सेवीकेच्या हातात ....

रूग्णांची गैरसोय : कंत्राटी आरोग्य सेविका करते आरोग्य तपासणी राजेश मुनीश्वर सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा-जमी, कोसमतोंडी व परसोडी या तीन गावांतील आरोग्य विभागाचे उपकेंद्र आता कंत्राटी आरोग्य सेवीकेच्या हातात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रूग्णांची गैरसोय होत असून तालुक्यातीलच आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे चित्र आहे.तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, बोपाबोडी, मंदीटोला व कोसमतोंडी या ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने असून २७ उपकेंदे्र आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून तालुक्यातील एक लाख सात हजार ४९९ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तिडका व पांढरी याठिकाणी आरोग्य सेवक नसल्यामुळे तेथील आरोग्य सुविधा दुसऱ्यांच्या खांद्यावर ओझे देऊन आरोग्याचा भार सांभाळण्याचे काम होत आहे. तालुक्यातील कोकणा-जमी, परसोडी-सडक व कोसमतोंडी या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी आरोय सेविका नसल्यामुळे ११ महिन्यांच्या कंत्राटावर ठेवलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. परसोडी उपकेंद्रात वडेगाव, परसोडी, बौध्दनगर व कोदामेडी या चार गावांचा समावेश केला आहे. या चार गावांची लोकसंख्या पाच हजार ६२६ आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार, दोन हजार ५०० लोकसंख्येच्या गावांना एक उपकेंद्र देणे गरजेचे आहे. पण चुकीच्या धोरणामुळे ही चार गावे एकाच उपकेंद्रात समाविष्ट करून आरोग्याचे धिंडवडे काढले आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वडेगाव व कोदामेडी या दोन गावांचे एक उपकेंद्र, परसोडी व बौध्दनगर यांचे एक उपकेंद्र देऊन खऱ्या अर्थांने आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पण अधिकारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवतील तेव्हाच काही होऊ शकेल. तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे ‘नाव सोनाबाई हाती कथलाचा वाडा’ अशी अवस्था आहे. दर्जा ग्रामीण रुग्णालयाचा दिला पण शासनाच्या नियमाप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेले नाहीत. लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पद भरण्याची गरज निर्माण झाली आहे. येणाऱ्या काही महिन्यांत सडक-अर्जुनी येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असल्याची कुणकुण सुरु असल्याची चर्चा आहे. उपजिल्हा झाल्यास तालुक्यातील कोणत्याही रुग्णांना गोंदिया, भंडारा, नागपूरला जाण्याची शक्यतो गरज भासणार नाही व बहुतेक औषधोपाचार येथेच होऊ शकतील.अनेक पदे रिक्तच तालुक्यातील तिडका व पांढरी या ठिकाणी पाच महिन्यांपासून आरोग्य सेवक नसल्यामुळे मलेरिया तपासणी, जलशुध्दीकरण व घरभेटी कार्य कशी होतात, ते त्यांनाच ठाऊक. सडक-अर्जुनी तालुक्यातील २७ उपकेंद्र्नांत राज्य शासनाचे आठ तर जिल्हा परिषद विभागाचे १७ आरोग्य सेवक आहेत. यापैकी जिल्हा परिषदेचे दोन आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.