शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2015 00:50 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आरोप : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतर करागोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून आर्थिक विवंचनेमुळेच आरोग्यसेवा घेऊ न शकल्याने तिडका येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक सुनील एन. येडेकर यांचा मृत्यू झाला, असा आरोप आरोग्यसेवकांनी केला आहे. तशी तक्रार व मागण्यांचे निवेदन सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. निवेदनानुसार, सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली असून दैनंदिन गरजा भागविणेही दुरापास्त झाले आहे. तिडका येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेवक येडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चांगल्या उपचाराची गरज होती. परंतु पाच महिन्यांपासून पगार झाला नसल्याने पैशाअभावी ते चांगला उपचार घेऊ शकले नाही. उपचारादरम्यान त्यांचा १० जून रोजी मृत्यू झाला.उल्लेखनीय म्हणजे, मार्च २०१५ मध्ये वेतनाचा प्रश्न घेऊन आरोग्य कर्मचारी खोडशिवनीची वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगळंगे यांना भेटले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्च एन्डिंगचे काम संपल्यावर वेतन काढण्याचे आश्वासन दिले. मात्र मे महिना संपला असूनही एकाही महिन्याचे वेतन दिले नाही. कर्मचाऱ्यांचा असाही आरोप आहे की, वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत अपमानास्पद शब्द वापरून जाणीवपूर्वक त्रास देतात. येडेकर यांच्या मृत्युनंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगळंगे व डॉ. आत्राम यांना वाहनाची मागणी केली असता, त्यांनी शासकीय नियमावर बोट ठेवून वाहन देण्यास नकार दिला. मात्र, हेच शासकीय वाहन खासगी कामासाठी वापरल्या जाते. यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांप्रतीची अनास्था दिसून येते. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा संयम संपला असून येत्या २५ जूनपर्यंत दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतरत्र हलविण्यात यावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन तातडीने काढण्यात यावे अन्यथा २६ जूनपासून खोडशिवनी आरोग्य केंद्रासमोर साखळी उपोषणाला बसू, असा इशारा २४ आरोग्यसेवकांनी शासन व प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)मार्च महिन्यापर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले आहेत. भानपूर व वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन बाकी होते, तेसुद्धा त्यांच्याच चुकीमुळे. आता सेवार्थ प्रणालीमुळे एकेक महिना वेतन होत नाही. याची प्रक्रिया एवढी किचकट आहे की ट्रेझरीमध्ये १०-१० दिवस बिल पडून असतात, पास होत नाही. पूर्वीची मॅन्युअली प्रक्रिया उत्तम होती, त्यात लवकरच वेतन होत होते. वेतन न झाल्यामुळे कुणाचाही मृत्यू होत नाही. एखाद्याला गंभीर आजार असेल तर उपचार घेण्यासाठी शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी सारख्या योजना आहेत. शासनाचे केटीएस व गंगाबाईसारखे रूग्णालये आहेत. -डॉ. हरीश कळमकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.