शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘जनजागरणा’त आरोग्य तपासणी

By admin | Updated: January 3, 2017 00:40 IST

जिल्हा पोलीस प्रशासन प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी

केशोरी पोलीस ठाणे : मोफत औषधोपचार व विविध योजनांची माहिती गोंदिया : जिल्हा पोलीस प्रशासन प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस ठाण्याद्वारे धमदीटोला येथील पटांगणावर जनजागरण मेळावा २०१६ पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धासुद्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे होते. जनतेला शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक मंगेश चव्हाण, नायब तहसीलदार कोपुलवार, वासनिक, कृषी मंडळ अधिकारी रामटेके, सिधराम, सरपंच मनिषा साखरे, जिल्हा दक्षता समिती सदस्य हरीशचंद्र उईके, सत्य सामाजिक संस्थेचे देवेंद्र गणवीर व नागपूर येथील पथक तथा आशा हॉस्पीटल कामटी नागपूरचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल यांचे पथक उपस्थित होते. त्यांनी शासकीय योजनांवर मार्गदर्शन केले. या वेळी धमदीटोला, ईळदा, परसटोला, अरततोंडी, जुनेवानी, राजोली, भरनोली परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. ३० डिसेंबर रोजी जनजागरण मेळाव्यामध्ये परिसरातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा, महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कृषी विभाग, भारतीय स्टेट बँक, स्वयंम रोजगार केंद्र, नक्षल सेल गोंदिया यांचे स्टॉल लावून जनतेला मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिर अंतर्गत अतिदुर्गम भागातील लोकांना डॉ. सौरभ अग्रवाल यांच्या पथकद्वारे तसेच डॉ. कुकडे यांच्या फिरत्या पथकाने २०० ते ३०० लोकांची नि:शुल्क रक्त तपासणी केली. पोलीस विभागाकडून औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या उपस्थितीत जनतेला नक्षलविरोधी माहिती, त्यांचा सर्वांगिण विकास, स्त्रियांचे कायदे व हक्क आणि शासन राबवित असलेल्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुमारे दोन ते अडीज हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता, त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन अनिल लाडे यांनी केले. आभार पोउपनि गोपाल यांनी मानले. कार्यक्रमासाठी सपोनि कुंभरे, पोउपनि महादेव जठार, पोउपनि विशेंद्रसिंग व सर्व पोलीस कर्मचारी, धमदीटोला येथील ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)