शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकालाच ठाऊक नाही शिक्षण सभापती कोण?

By admin | Updated: October 22, 2016 00:34 IST

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी इतर जि.प. पदाधिकाऱ्यांसह तिरोडा तालुक्यातील पिपरीया जि.प. वरिष्ठ शाळेला भेट दिली.

पिपरीया शाळेतील प्रकार : जि.प. शाळेवरील शिक्षकांचे असेही सामान्य ज्ञानपरसवाडा : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी इतर जि.प. पदाधिकाऱ्यांसह तिरोडा तालुक्यातील पिपरीया जि.प. वरिष्ठ शाळेला भेट दिली. दरम्यान मुख्याध्यापकांना जि.प.चे शिक्षण सभापती कोण? अशी विचारणा केली. मात्र अर्धातासपर्यंत ते मुख्याध्यापक शिक्षण सभापती कोण? हे सांगू शकले नाही. त्यामुळे सदर शाळेच्या शैक्षणिक कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरीया येथे जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे तसेच माजी जि.प. सदस्य डॉ. योगेंद्र भगत, रमेश पटले, राधेलाल पटले व हुपराज जमईवार यांनी भेट दिली. सर्वप्रथम जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी अंगणवाडीला भेट दिली. त्यावेळी अंगणवाडीत संपूर्ण दुरवस्था दिसून आली. फलकावर जुन्याच पदाधिकारी, अधिकाऱ्यांची नावे होती. अंगणवाडी सेविका सीमा शुक्ला यांचे कार्य असमाधानकारक असल्याचे दिसून आले. यानंतर लगेच शौचालयाची पाहणी करण्यात आली. शौचालय पूर्णत: मोडकळीस आलेले असून केरकचरा भरलेले आढळले. यानंतर कार्यालयात गेल्यावर खुर्चीवर धूळ पसरलेली आढळली. जि.प. अध्यक्षांनी स्वत:च्या हातांनी धुळ स्वच्छ केले. माहिती फलक बघितले असता त्यात जुन्या पदाधिकाऱ्यांची नावे असल्याने उच्चश्रेणी मुख्याध्यापक डी.पी. नागपुरे यांना जि.प.चे शिक्षण सभापती कोण? अशी विचारणा करण्यात आली. मात्र मुख्याध्यापक नागपुरे उत्तर देवू शकले नाही. अर्ध्या तासपर्यंत जि.प.अध्यक्ष उषा मेंढे व स्वत: शिक्षण सभापती पी.जी. कटरे सदर प्रश्न विचारत असूनही मुख्याध्यापक योग्य उत्तर देण्यास असमर्थ ठरले. मुख्याध्यापकाला शिक्षण सभापती बाबत काहीही माहितीच नव्हती. यानंतर जमईवार यांनी गमतीने बारीक आवाजात सावंत असू शकतात असे बोलले. यावर अर्ध्या तासानंतर मुख्याध्यापक नागपुरे यांनी सावंत शिक्षण सभापती असल्याचे हास्यस्पद उत्तर जि.प.अध्यक्ष मेंढे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांना सांगितले. यावर मुख्याध्यापक किती हुशार व तरबेज आहेत, ते विद्यार्थ्यांना काय शिकवित असतील? असा प्रश्न उपस्थित पदाधिकारी व पालकांना पडला. मुख्याध्यापक दररोज शाळेत उशिरा येतात. मिटिंगच्या नावावर साडेबारा वाजता निघून जातात तसेच परसवाडा येथील पानटपरीवर बसून राहता अशी तक्रार पालकांनी केली. परंतु केंद्र प्रमुख खोब्रागडे यांनी कधीही मुख्याध्यापकावर कारवाई केली नाही. साटेलोटे घेवून प्रकरण दाबण्यात आले. केंद्रप्रमुख यांनी व्हीजीट पुस्तकात तसे नमूद केले पण कार्यवाही केली नाही. तसेच वरिष्ठांनाही कळविले नाही. अशा मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी जि.प.अध्यक्ष मेंढे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्याकडे केली. सदर पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक कसे आहेत हे स्वत:च बिघतले आहे. (वार्ताहर)