शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:52 IST

ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील व्यवहार ठप्प : आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.ग्रामीण भागामध्ये शासनाच्या मोबाईल सेवेचा अधिक लाभ घ्यावा म्हणून भारत दूरसंचार निगमने शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर प्लान काढून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा गवगवा केला. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेवा मुळीच देत नाही. उलट भारत दूरसंचार सेवा ठप्प करुन खासगी मोबाईल कंपन्यांना मोबाईल रेंज पुरविण्याचा छुपा करार करुन ग्राहकांना हक्कापासून वंचित करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत. भारत दूरसंचार कंपनीने ग्रामीण भागात त्वरीत सेवा दुरुस्त करुन ग्राहकांची डोकेदुखी थांबवावी.अन्यथा ग्राहक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे व सरपंच संघटनेचे महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सेवा नॉट रिचेबलगावकरी संतप्त : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गेल्या २४ जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा भारत संचार निगम लिमिटेडच्या येथील ग्राहक सेवा केंद्राने न केल्यामुळे व जनरेटरचा डिझेल कोटा संपल्यामुळे बीएसएनएलची टेलीफोन, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे मात्र ग्राहक, सरकारी कार्यालय व बँकाची फारच गैरसोय होत आहे.गेल्या २४ जानेवारी रोजी विज बीलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या येथील ग्राहक सेवा केंद्राचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे टेलीफोन (लॅन्डलाईन), मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. डीजीटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या काळात वीज बिल भरण्यासाठी व जनरेटर चालविण्यासाठी निधी असू नये असा सवाल करुन रवी लंजे यांनी संताप व्यक्त केला आहे.सेवा ठप्प झाल्याने परिसरातील टेलीफोन धारक, मोबाईल व इंटरनेट सेवा वापरणारे ग्राहक, बॅँका व सरकारी कार्यालयांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून दुरसंचार सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी नवेगावबांध ग्रामवासीयांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल