शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'तो' निघाला मांजरीच्या शिकारीच्या शोधात पण अडकला वनविभागाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 12:00 IST

घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत रामटेके यांच्या घरी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एक बिबट्या दबा धरुन बसतो. घरातील सर्व लोक साखर झोपेत असताना खाटेखाली बिबट बसलेला दिसताच सर्वांची झोपच उडून जाते. प्रसंगावधान राखून घरचे मंडळी घराबाहेर पडतात. बिबट मात्र घराच्या छपरीतील खाटेखाली बस्थान मांडून बसून राहतो. घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. पहाटे साडेतीन वाजता वनविभागाला माहिती दिली जाते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेला श्वास सोडला. हा सर्व घटनाक्रम आज (दि.२) पहाटेच्या सुमारास घडला.

बोंडगावदेवीपासून ३ कि.मी. अंतरावर स्थानिक क्षेत्र सहाय्यक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत रामटेके यांच्या घरात मांजरीचा पाठलाग करताना बिबट्याने चक्क घरात प्रवेश केल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. गावाशेजारी जंगल व्याप्त परिसर आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. आपली शिकार शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला खांबी गावाशेजारील घराजवळ मांजर दिसली. मांजरीचा पाठलाग करताना तो बिबट यशवंत रामटेके यांच्या घरातच शिरला.

समोरचा दरवाजा उघडा ठेवून रामटेके परिवार झोपी गेले होेते. घरात मांजराची शिकार करताना बिबट्याची हालचाल घरातील लोकांच्या लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता घरातील तिघेही जण घराबाहेर पडले. बाहेरुन दरवाज्याची कडी लावल्याने बिबट घरामध्ये जेरबंद झाला. घरातील बिबट्याचा थराराचा प्रसंग रामटेके यांनी गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना सांगितला. सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटील ठाकराम मेश्राम यांनी वनविभाग,पोलीस स्टेशन यांंना पहाटे तीन वाजता माहिती दिली. माहिती मिळताच संबंधित अधिकारी खांबी येथे घटनास्थळी दाखल झाले.

तोपर्यंत बघ्यांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. बिबट घरातील खाटेखाली दबा मारुन बस्तान मांडला होता. रेस्क्यू टिम गोंदियाने कमान हातात घेतली. घरातील सर्व परिसरात जाळे टाकण्यात आले. बाहेरील दरवाजा समोर पिंजरा लावण्यात आला. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरवाज्या शेजारी बस्तान मांडून असलेल्या बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला सकाळी ७.४५ वाजता यश आले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.यानंतर बिबट्याला नवेगावबांधला हलविण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्या