शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भूक शमविण्यासाठी त्याने संपविले अर्धे कुटुंब

By admin | Updated: May 19, 2014 23:42 IST

मुळातील खोडकर स्वभाव असलेल्या व्यक्तीने पत्नीसोबत संसार करताना उभ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी पत्नीच्या चारित्र्यावर संशय केला. मुले बाळे झाली, नातवंडही मोठी होऊ लागली.

नरेश रहिले - गोंदिया

मुळातील खोडकर स्वभाव असलेल्या व्यक्तीने पत्नीसोबत संसार करताना उभ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी पत्नीच्या चारित्र्यावर संशय केला. मुले बाळे झाली, नातवंडही मोठी होऊ लागली. तरी देखील या म्हातार्‍याचा पत्नीच्या चारित्र्यावरील संशय कमी होत नव्हता. यातुनच त्यांच्या घरात खाक्या उडायच्या. याची कटकट पाहून मुलांनी आठ दिवसांपूर्वी घराबाहेर काढले. परंतु स्वभाव खोडकर असल्याने गावातील एकाने ही त्याला जेवन दिले नाही. त्यामुळे आठ दिवसांपासून भूकेने व्याकुळ असलेल्या पांडूरंग अगडे (६२) याने गेल्या सोमवारच्या (दि.१२) पहाटे ५ वाजता अर्धे कुंटुब संपविले. गोरेगाव येथील आरोपी पांडुरंग अगडे याचे पत्नी बिरणबाई (५७) हिच्या सोबत लग्नापासूनच पटत नव्हते. तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याचे स्वभाव गुण मुळातच भांडखोर वृत्तीचा असल्यामुळे त्याने शेजार्‍या-पाजार्‍यांशी उभ्या आयुष्यात अनेकदा वाद घातला. त्याच्या स्वभावामुळे त्याला कुणी आपल्याघरी येऊ देत नव्हते किंवा त्याच्या घरी जात नव्हते. त्याला दोन मुळे होती. यातील एक मुलगा आपल्या पत्नीला घेवून बाहेरगावी गेला होता. तर एक मुलगा, सुन, पत्नी व तीन नातवंडे घरीच होते. घटनेच्या आठ दिवसापूर्वी त्याने गहू विकतो म्हणून पत्नी व मुलाशी भांडण केले. त्यामुळे याच्या कटकटीला पाहून मुलगा छन्नालाल पांडूरंग अगडे (३७) याने त्याला घराबाहेर काढले. घरीच अंगणात खाट टाकून राहायचा. परंतु घरचे अन्न त्याने आठवडाभर सेवन केले नाही. भुकेने व्याकूळ झालेल्या पांडुरंगला घरच्यांचा राग होता. घरातील कुणी जवन कर म्हणत नाही, आपल्याला सन्मानाची वागणूक देत नाही यातून वैतागलेल्या पांडुरंगने आपली भूक शमविण्यासाठी घरातील अर्धे कुटुंब संपविण्याचा चंग बांधला. ११ मेच्या रात्री पासूनच त्याने आपल्या कुटुंबातील लोकांना संपविण्याचा चंग बांधला होता. रात्रभर त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते. १२ मेच्या सकाळी ५ वाजता उठल्यावर त्याने आपल्यजा हातात घरातील घण घेतला. पहिल्यांदा मुलगा घन्नालाल याच्या डोक्यावर घणाने घाव घालून जागीच ठार केले. त्यांतर आपली पत्नी बिरणबाईवर घणाने वार केले. यावेळी सासूच्या बचावासाठी आलेल्या योगेश्वरी (३२) या सुनेवरही घणाने घाव घालून त्या तिघांना ठार केले. व आपल्याला कुणी पकडू नये यासाठी तो तिथून पसार झाला. या संदर्भात गोरेगाव पोलिसांनी त्याला अटक करून २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची साक्षीदार त्याची १४ वर्षाची नात होती. तिच्या सोबत आणखी दोन चिमुकले मुले होती. परंतु त्यांना आरोपीने काहीही केले नाही. पत्नी व सुनेच्या डोक्यावर घणाने घाव घातल्या नंतर आरोपीने त्या दोघींवर रॉकेल टाकून जाळले. पोटाच्या आगीमुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सांगितले.