शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी ते वडगाव व खोडदा हा मार्ग गेल्या १० वर्षात खड्डेमय झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी ते वडगाव व खोडदा हा मार्ग गेल्या १० वर्षात खड्डेमय झाला होता व त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाने नेहमी दुर्लक्षच केले. अशात केशोरी येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्‍याम धामट यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून संपूर्ण खड्डे बुजवले.

सरकारे बदलली मात्र या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली. त्यामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली होती. परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागायची. पावसाळ्यात तर या रस्त्याने प्रवास म्हणजे जणू यमलोकीची यात्रा करणेच ठरत होते. या क्षेत्राला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार लाभले आहेत व त्यांच्याकडे वारंवार रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली. मात्र, या कामासाठी निधी खेचून आणण्यात आमदार कमी पडले.

सोबतच त्यांना निवडून देणाऱ्या मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनाही जनतेचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. अखेर तालुका काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धामट यांनी जनतेच्या सोईसाठी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची डागडुजी केली. धामट यांच्या दातृत्वामुळे परिसरातील जनतेला खड्डेमय रस्त्यापासून मुक्ती मिळाली. परिसरातील नागरिकांनी धामट यांचे आभार मानले आहेत.