शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांसाठी तयार करणार हॉकर्स झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:56 IST

शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठी सर्वेक्षण करण्याचे काम नागपूर येथील एका संस्थेला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन सर्वेक्षण : स्थायी स्वरुपात मिळणार दुकान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील विविध भागात फिरुन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना भविष्यात त्यांचे हक्काचे दुकान मिळावे आणि त्यांच्यासाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे.यासाठी सप्टेबंर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर फेरीवाल्यांना दुकाने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठी सर्वेक्षण करण्याचे काम नागपूर येथील एका संस्थेला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेतंर्गत हॉकर्स झोनसाठी यापूर्वी सुध्दा सर्वेक्षण करण्यात आले आहे.त्यामुळे हे सर्वेक्षण आता अंतीम असल्याचे बोलल्या जाते. या सर्वेक्षणाच्या आधारावर शहरातील फेरीवाल्यांची एक यादी तयार केली जाणार आहे.या यादीमध्ये ज्या फेरीवाल्यांचा समावेश असेल त्यांना हॉकर्स झोनमध्ये दुकाने उपलब्ध करुन दिले जाणार आहे.हे काम युध्द पातळीवर करण्यासाठी एका अस्थायी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये शहरातील विविध भागात कार्यरत नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीची सभा सुध्दा चार पाच दिवसांनी होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हे काम विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणानंतर त्यांच्या हितासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण यादीतील फेरीवाल्यांना मतदानाचा अधिकार सुध्दा मिळणार आहे. ही समिती हॉकर्स झोनसाठी जागेची निवड करेल तसेच किती झोन तयार करायचे याचा निर्णय सुध्दा घेईल.विशेष म्हणजे यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून किती निधीची गरज आहे याच्या मागणीचा प्रस्ताव सुध्दा तयार करुन पाठविण्याची जवाबदारी ही या कमिटीची असणार आहे.नगर परिषदेसमोरील जागेत हॉकर्स झोनशहरात नगर परिषदेसमोर चार एकर जागा उपलब्ध आहे. याठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना हटवून संकुल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. चार मजली संकुलात व्यापाऱ्यांना दुकानांसाठी जागा दिली जाणार असून व्यापाऱ्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर हॉकर्स झोन तयार करण्यात येणार आहे.फेरीवाल्यांना दुकानांचा उपयोग होणार का?शासनाने शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करुन त्यांना दुकाने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेरीवाल्यांना काही रक्कम जमा करावी लागणार आहे. मात्र ही रक्कम ते आणणार कुठून हा सुध्दा प्रश्नच आहे. फेरीवाले हे शहरातील गल्ली बोळात जाऊन सामानांची विक्री करतात. मात्र त्यांनी एकाच ठिकाणी दुकान लावल्यानंतर तिथे ग्राहक येणार का हा सुध्दा प्रश्न आहे.त्यामुळे बहुतेक फेरीवाल्यांना दुकांनाचा आपल्याला फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगितले.शासनाचा फेरीवाल्यांना स्थायी स्वरुपात दुकाने उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा हेतू आहे. यासाठी फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्याच्या दिशेने काम सुरू करण्यात आले असून याची त्यांना निश्चितच मदत होईल.- धनराज बनकर, व्यवस्थापक दीनदयाल उपाध्याय नागरी अभियान न.प.गोंदिया.

टॅग्स :hawkersफेरीवाले