शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

By admin | Updated: September 28, 2016 01:19 IST

आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा म्हणजे आत्महत्येची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन प्राचार्य रिजवाना अहमद यांनी केले.

रिजवाना अहमद : जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरागोंदिया : आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा म्हणजे आत्महत्येची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन प्राचार्य रिजवाना अहमद यांनी केले.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक आरोग्य पथकातर्फे रविवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त केटीएस रुग्णालयात जनजागरण कार्यशाळा घेण्यात आली. यात आपल्या उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. उद्घाटन एस.एम. पटेल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रिजवाना अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मीनल भिसे पाटील, मार्गदर्शक डॉ. सुवर्णा हुबेकर, मनोचिकित्सक डॉ. आनंद लाडे, दंतचिकित्सक डॉ. मनीष बत्रा, डॉ. येळणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मानसिक आरोग्य पथकाच्या समन्वयक वैशाली थूल यांनी मांडले. १६ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध महाविद्यालयांतून आत्महत्या प्रतिबंध कार्यक्रम जनजागरण अभियान राबविण्यात आल्याची माहिती वैशाली थूल यांनी दिली. जिल्हा शासकीय परिचर्चा केंद्र येथील प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपयशामुळे कसे मानसिक संतुलन बिघडते व मचोचिकित्सकांच्या समुपदेशनामुळे आत्महत्या कशी टाळली जावू शकते, याबाबत एक लघुनाटिका सादर केली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मीनल भिसे पाटील यांच्या हस्ते प्राचार्य रिझवाना अहमद यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पौंगडावस्थेत जास्तीत जास्त मुलींना सकारात्मक समुपदेशन करून करिअरला टर्निंग पार्इंट दिल्याबद्दल व आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे प्राचार्य रिझवाना अहमद यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्य रुग्ण व नातेवाईकांनी घेतला. याप्रसंगी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)