शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

रविराजाच्या वक्रदृष्टीने होरपळतोय जिल्हा

By admin | Updated: May 15, 2016 01:21 IST

यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले.

तापमान ४४.८ : आणखीही चढण्याची शक्यता गोंदिया : यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले. वाढत्या उन्हामुळे जीव आता कासावीस होऊ लागला असून कधी उन्हाळ््यापासून सुटका होते याची वाट सर्वच बघू लागले आहेत. मात्र मे महिना आता जेमतेम अर्ध्यातच आला असून उरलेल्या या १५ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाशी छेड करून आपली नवी दुनिया वसविण्याचा घाट सुरू केला आहे. याचा ऋतुचक्र व निसर्गावर परिणाम पडत आहे. झाडांची कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचे जंगल आज निगर्साला मारक ठरत असून याचेच परिणाम आहे की, पावसाळ्यात पाऊस पडत नसून उन्हाळ्यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पूर्वी कधीही ४५ डिग्रीपर्यंत न जाणारे तापमान आता ४५ डिग्रीच्या जवळ पोहोचले असून तापमानाची ही पातळी वाढतच जाणार आहे. यंदाही असाच काहीसा प्रकार जाणवू लागला आहे. यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.यामुळे या दोन महिन्यात तापमान उतरले होते व उन्हाळा तेवढा काही भासला नाही. मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुर्यदेवाने जिल्हावासीयांना चटका देण्यास सुरूवात केली. (शहर प्रतिनिधी)१ व १३ मे सर्वाधिक उष्ण मे महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्याने आग ओकून आपली ताकद दाखवून दिली आहे. १ मे रोजी ४३ डिग्री तापमानाची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली. दि.१४ ला तापमान ४४.८ डिग्रीवर पोहोचले. तापमानाची ही पातळी पुढील १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात अशीच राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात ६ तारखेला सर्वात कमी ३५.३ डिग्री तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. उष्माघाताचा बळी नाहीउष्माघाताचे प्रकार लक्षात घेता आरोग्य विभागाने येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार ठेवले होते. या कक्षात उष्मा लागणचे सुमारे ३५ रूग्ण भर्ती करण्यात आले होते. या रूग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. मात्र उष्माघाताने यावर्षी एकही दगावला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवी धकाते यांनी दिली.