शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरात हर हर महादेवचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर्षात साधारण १२ ते १४ शिवरात्री असतात, या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात तालुक्यातील नागरा, पिंडकेपार, शिवधाम व कामठासह जिल्ह्यातील शिवमंदिरात मंगळवारी (दि. १) पहाटेपासूनच महाशिवरात्रीनिमित्त पूर्जाअर्चा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रांवर बंदी लादली होती. मात्र, पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली होती, त्यामुळे भाविकांनी सकाळपासून जिल्ह्यातील विविध शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर्षात साधारण १२ ते १४ शिवरात्री असतात, या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असते. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शिव मंदिरांमध्ये ‘हर हर महादेव’चा गजर सुरू झाला. भाविकांनी सकाळीच नागरा, कामठा, शिवधाम, पिंडकेपार, पोंगेझरा येथील शिव मंदिर गाठून मनोभावे पूजाअर्चा करून परिवारासाठी मंगलमय कामना केली. या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर व्यवस्थापन समित्यांनी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात चोख व्यवस्था केली होती. 

नियमांचे पालन करीत दर्शन - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने काळजी घेतली होती. मंदिर परिसरात भाविकांना मास्क तसेच आवश्यक नियमांचे पालन करण्याच्या सूचना सेवक करीत होते. महाप्रसादाचे वितरण - नागरा, कामठा, शिवधाम येथील मंदिर परिसरात विविध सामाजिक संस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काही संस्थांनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री