शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सहा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:32 IST

अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देजात पडताळणी प्रमाणपत्र : ७८ कर्मचाऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र जिल्ह्यातील सहा सदस्यांनी अद्याप सहा महिने लोटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.जिल्ह्यात ८३० ग्रामपंचायत असून यात साडेतीन हजार ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रे जोडावी लागतात. ज्या सदस्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल त्यांना ते निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत सादर करावे लागते. तसे शपथपत्र सुध्दा त्यांना निवडणूक अधिकाºयांना भरुन द्यावे लागते. निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होते. जिल्ह्यात मागील वर्षी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडला. त्यानंतर निवडून आलेल्या जिल्ह्यातील ३ हजार उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे अर्ज केले होते. त्यानंतर जिल्ह्यास्तरीय समितीने विशेष शिबिर व मोहीम राबवून या सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिली. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या सहा सदस्यांनी अद्यापही कागदपत्रांची पूर्तत: केलेली नाही. त्यामुळे या सदस्यांचे सदस्य रद्द करण्याची कारवाही केली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांवर संकटशासकीय नोकरीवर रूजू होणाऱ्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असता. अन्यथा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची व बडतर्फीची कारवाही केली जाते. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात कार्यरत ७८ कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. या कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे प्रलबिंत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची वेळीच पूर्तत: न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाही होण्याची शक्यता आहे.जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या सर्व अर्जांची सहा महिन्याच्या आत कारवाही करुन प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले. यासाठी समितीने धडक मोहीम राबविली. त्यामुळे जिल्ह्यात पेडींग अर्जांची संख्या फारच कमी आहे.ज्यांचे अर्ज प्रमाणपत्र प्रलबिंत आहेत त्यांनी त्वरीत कागदपंत्राची पुर्तता करुन समितीच्या कार्यालयात उपस्थित राहावे.- मधूसूदन धारगावे, उपायुक्त, जात पडताळणी समिती गोंदिया.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रgram panchayatग्राम पंचायत