शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तिकारांचे हात कामाला लागले

By admin | Updated: June 16, 2017 01:07 IST

येत्या १४ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे.

गोंदियातली चितारओळ गजबजली : मूर्त्या येताहेत आकारालालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या १४ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मूर्तिकार आपले बस्तान मांडत असल्याने पुन्हा एकदा गोंदियातली चितारओळ गजबजून गेली आहे. मूर्तिकारांनी आतापासूनच मूर्त्या बनविण्यास सुरूवात केल्याचेही दिसून येत आहे. कुंभारांचा परिसर व मूर्त्यांसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मुर्त्यांची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत आहे. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तिकार येत असून यंदाही मूर्र्तिकारांचे परिवार येथे आले आहेत. हनुमान चौकापासून या मुर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मुर्त्या तयार करतात. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मुर्तीपूजेला तेवढाच मान आहे. यंदा १४ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी असून मुर्तीपूजनाचे सण सुरू होत आहेत. २५ आॅगस्ट रोजी गणपती स्थापना येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाबाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मुर्तीकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मुर्त्या बनविण्यास सुरूवात केली असल्याचेही दिसत आहे. मोठ्या संख्येत मूर्तिकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते इंगळे चौक हा परिसर जणू ‘चितारओळ’ म्हणूनच प्रसिद्ध झाला आहे. शिवाय इंगळे चौक पुढील परिसरातही काही मुर्तीकार येत असून व्यवसाय करतात. आता सध्या तरी एक-दोनच परिवारांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य मुर्तीकारांनी ते नेहमी राहत असलेल्या जागांच्या मालकांची भेट घेतली असून लवकरच ते राहण्यासाठी येतील. आपल्या घरात मूर्तिकारांच्या हातून साक्षात देवच घडत असल्याने घरमालकही खुशी-खुशी मूर्र्तिकारांना आपले घर किंवा जागा देतात. छत्तीसगड मधील मूर्तिकारांचेही आगमन येथील सिव्हील लाईन्स परिसरात लगतच्या गावांतील मुर्तीकार येत असून आपला व्यवसाय करून निघून जातात. मागील काही वर्षांपासून मात्र त्यांच्यासोबतच लगतच्या छत्तीसगड राज्यातीलही काही मुर्तीकार गोंदियात येवू लागले आहे. तसेच बंगाली मुर्तीकार सुद्धा येतात. त्यामुळे गोंदियाचा सिव्हील लाईन्स परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. कान्होबा व गणपतीच्या मूर्त्यांची सुरूवात मूर्तिपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य सण येतात. येत्या १४ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तिकारांनी आतापासूनच कान्होबाच्या मूर्त्या तयार करण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येकच मूर्तिकाराच्या मंडपात कान्होबाच्या मूर्त्या तयार होताना दिसत आहेत. तर काही मूर्तिकार गणपतीच्या मूर्त्यांपासून सुरूवात करीत असल्याने त्यांनी गणपतीच्या मूर्त्यांची तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे.