शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अडीच हजार लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:48 IST

मागील चार वर्षापासून आमगाव नगर परिषद, ग्रामपंचायत, नगर पंचायत की नगर परिषद या वादात अडकली आहे. दरम्यान याचा परिणाम येथील विकास कामांवर होत आहे.आमगाव नगर परिषदेचा प्रश्न मागील चार वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे.त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । नगर परिषदेच्या वाद्यांत अडकली आवास योजना, लाभार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील चार वर्षापासून आमगाव नगर परिषद, ग्रामपंचायत, नगर पंचायत की नगर परिषद या वादात अडकली आहे. दरम्यान याचा परिणाम येथील विकास कामांवर होत आहे.आमगाव नगर परिषदेचा प्रश्न मागील चार वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे.त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आहे. जवळपास अडीच हजारावर लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार की भंगणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये तालुका स्तरावरील ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा दिला.आमगावला सुध्दा नगर पंचायत घोषीत करण्यात आले. परंतु स्थानिकांनी आमगावला नगर परिषद बनविण्यात यावे अशी मागणी रेटून धरली. नगर परिषद बनविण्यासाठी किमान २५ हजार लोकसंख्येची अट आहे. तेव्हा आमगाव शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा यात समावेश करुन नगर परिषद तयार करण्यात यावी असा आग्रह धरला. आमगव ग्रामपंचायतमध्ये बनगाव, रिसामा, कुंभारटोली, पदमपूर, माल्ही, किंडगीपार,बिरसी आणि इतर सात ग्रामपंचायतचा समावेश करुन प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने एकूण आठ ग्रामपंचायतीची ३४ हजार ५६४ एवढी लोकसंख्या पाहून २ आॅगस्ट २०१७ ला आमगाव नगर परिषदेची घोषणा केली.परंतु यातील काही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काही लोकांनी आमगाव नगर परिषदेत समावष्टि करु नये, म्हणून न्यायालयात धाव घेतली. या सर्व प्रकारामुळे मागील चार वर्षापासून निवडणूक झालेली नाही. प्रशासकाच्या भरोश्यावर नगर परिषदेचे कामकाज सुरू आहे. पण याचा थेट परिणाम या क्षेत्रातील सर्वसामान्य गरीब जनतेवर होत आहे. मागील चार वर्षापासून येथील जनतेला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून कुणीही पुढाकार न घेता नगर परिषदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण सांगून याकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु काही प्रबुध्द सामाजिक कार्यकर्त्यानी या प्रकरणाची दखल घेत हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला.नगर परिषदेचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रशासकाच्या माध्यमातून न.प.ची सर्व कामे सुरळीत करता येतात. तसेच जनतेला शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घेता येऊ शकते. ही बाब शोधून काढली.पंतप्रधानाचे लक्ष्य कसे पूर्ण होणारयेत्या अडीच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. आमगाव नगर परिषदेत एकूण १२ हजार ६० कुटुंब वास्तव्यात असून एकूण घरांची संख्या ९ हजार ५७३ आहे. अशात २ हजार ४८७ कुटुंबांना घरकुल योजनेची गरज आहेत. मागील चार वर्षात एकाही कुटूंबाला घरकुलाचा किंवा शौचालयाचा लाभ मिळाला नाही. अशात गरजू लाभार्थ्याची संख्या अडीच हजाराच्यावर गेली आहे. तांत्रीक अडचणी दूर करुन घरकुलासाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर उपलब्ध होऊ शकतात.नगर परिषदेच्या वांद्यात जनतेची फजितीमागील चार वर्षापासून आमगाव नगर परिषदेत अनेक आव्हाने निर्माण करण्यात आली. प्रकरण न्याय प्रविष्ठ झाल्याने आमगाव नगर परिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आवास योजनेत न.प.ची नोंद नाहीपंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत नगर परिषदेतील नागरिकांना घरकुल व शौचालयाचा लाभ घेता येतो. परंतु आमगाव नगर परिषदेची या योजनेकरिता नोंद झाली नसल्याने या योजनेचा निधी नगर परिषदेला मिळत नसल्याची बाब समोर आली. भेरसिंह नागपुरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगर परिषदेची नोंद करुन या योजनेचा लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा करुन देण्यासाठी सचिवांसोबत सविस्तर चर्चा केली. सचिवाने ही अडचण लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले. या वेळी काशीराम हुकरे, रेखलाल टेंभरे, हुकुमचंद बोहरे उपस्थित होते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना