शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पण सोहळ्याच्या अर्ध्या तासात फुटली पाईपलाईन

By admin | Updated: August 30, 2014 23:52 IST

ग्रामपंचायतअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला विस्तारित करुन नागरिकांच्या हक्काचे पाणी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्यातील गावांना देण्याचा राजकिय पुढाऱ्यांचा निर्णय नागरिकांना डोईजड होत आहे.

आमगाव : ग्रामपंचायतअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला विस्तारित करुन नागरिकांच्या हक्काचे पाणी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्यातील गावांना देण्याचा राजकिय पुढाऱ्यांचा निर्णय नागरिकांना डोईजड होत आहे. तर लोकार्पण सोहळा आटोपताना अपूर्ण बांधकाम योजनेतील पाणी पुरवठा सुरु केल्याने अर्ध्या तासातच जल वाहिनी फुटून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाहण्याचे चित्र दिसून आले.आमगाव येथील नागरिकांना वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने आमगावला पाठीव पाणी पुरवठा मंजूर केला. परंतु या योजनेचे राजकारण करण्यासाठी राजकिय पुढारी नागरिकांचे हक्काचे पाणी पळवित असल्याने आता नागरिकांना हा निर्णय डोईजड होत आहे.आमगाव येथील नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने जुनी स्वतंत्र पाणी पुरवठा ही कालबाह्य झाली आहे. पाणी पुर्ततेसाठी साठवण जलकुंभ कमी क्षमतेचे असल्याने दररोज लागणारे पिण्याचे पाणी समाधानकारक मिळत नाही. जुने कालबाह्य ठरलेली जलकुंभ जमिनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पुर्वीच जलकुंभाची कमतरता असल्याने वाढीव पाणी पुरवठा योजनेतील जलकुंभ थोडे समाधान करणारे आहे. परंतु नवीन आमगाव वाढीव पाणी पुरवठा योजना रखडत चालणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला समाविष्ठ करण्याचा प्रयत्न काही राजकिय पुढाऱ्यांनी पुढे केला आहे. आमगाव येथे राजकिय दडपण वापरुन स्वतंत्र असलेली पाणी पुरवठा योजना बनगावला समाविष्ठ करण्याचे काय युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आमगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी समस्यांना समोर जावे लागणार आहे.आमगाव येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कार्य सुरु आहे. परंतु श्रेय लादण्याच्या प्रयत्नात दि. २८ आॅगस्टला अपूर्ण बांधकाम असलेल्या योजनेचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला. परंतु योजनेचे लोकार्पण सुरु असतानाच या योजनेतील जलवाहिण्या अनेक ठिकाणी फुटल्या. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. त्यामुळे लोकार्पणाचे पितळ उघडे पडले. आजघडीला या योजनेचे कार्य अपुर्णच आहे. (शहर प्रतिनिधी)