शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:31 IST

येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या : आता पोहोचतो नगर पंचायतचा टँकर, नळ योजनेचा अभाव, दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाने गावकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबीटोला प्रभाग क्रं. ५ व श्रीरामपूर प्रभाग क्रं. १ मधील विहीरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकर लावले त्यामुळे पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. दररोज सकाळी या दोन वार्डात पाणी पुरवठा केला जातो. एका टँकरमागे नगरपंचायत प्रशासनाला एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत आहे.श्रीरामपूर येथील ७० कुटूंब व हलबीटोला येथील १०० कुटूंबांना दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायतने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले असले तरी हलबीटोला, श्रीरामपूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी न.प.ला टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.शेतातील बोअरवेलमुळे पाणीटंचाईगोरेगाव शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या शेतात २०० ते ३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदलेले आहे. त्यामुळे खरीप व रब्बी पिक घेणाºया शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. परिसरातील बोअरवेलमुळे १०० ते १५० फुटाच्या बोअरवेलचे पाण्याचे साठे कमी झाले तर विहीरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. शेतातील बोअरवेलमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी पुरवठा योजना नाहीहलबीटोला व श्रीरामपूर येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे परिसरातील तळे व इतर पाणीसाठे वाळत असल्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शंभर लिटर पाणीयेथील दोन्ही वॉर्डात टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास १७० कुटूंब टॅकरच्या पाण्यावर अवलंबून असून न.प.द्वारे एका कुटूंबाला १०० ते १५० लिटर पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दोन्ही वॉर्डात नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून पाणी टंचाई दूर केली जाईल.- आशीष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.वॉर्ड क्रं. ५ व वॉर्ड क्रं. १ मध्ये एकूण चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. एवढ्यावरच नागरिकांचे भागत नसून पुन्हा चार टँकरची गरज आहे. त्याकडे नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.- रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक श्रीरामपूर.