विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेला प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्य स्थळ हाजराफॉल सध्या दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी महाराष्टÑ, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.शेकडो किमीचे अंतर पार करीत आपल्या चारचाकी, दुचाकी वाहनांनी येणाºया पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. हे पर्यटनस्थळ दर्रेकसा रेल्वे स्टेशनपासून जवळच असल्यामुळे तसेच सालेकसा-दरेकसा मुख्य मार्गालगत परिसर असल्यामुळे या ठिकाणी रेल्वे आणि बसने प्रवास करुन येणाºया पर्यटकांची संख्यासुद्धा मोठी असते.पूर्व भागातील सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेला हाजराफॉल धबधबा घनदाट जंगल, वन्य जीवांचा वावर आणि पक्षांच्या मधूर आवाजात उंच पहाडावरुन धो-धो करीत खाली पडतो. वरील तीन नाल्यांचा पाणी एकत्रित होवून पहाडावरुन खाली पडत असताना पाण्याचे तुषार संपूर्ण परिसरात उडतात. या ठिकाणी उभे राहिल्यास शरीराला त्या तुषारांचा मऊ स्पर्श मनाला प्रफुल्लीत व उत्साहीत करणारा ठरतो. घनदाट, सदाबहार व हिरवेगार जंगल येथे असल्यामुळे शुद्ध वायूचा श्वास आणि स्वच्छ वातावरणामुळे जणू नंदनवनात असल्याची अनुभूती येते.उंच मचानावर बसून धबधबा पाहण्यासह निसर्गमय परिसर बघणे खूप आनंददायी ठरते. या ठिकाणी सहपरिवार आल्यास संपूर्ण कुटुंब येथील निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेवू शकते. कोणत्याही कुटुंबाला पावसाळी पिकनिक करायची असेल तर त्यांच्यासाठी हाजराफॉल म्हणजे सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे. आता शासनाने हाजराफॉलच्या विकासाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
पर्यटकांना आकर्षित करतोय हाजराफॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:09 IST
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेला प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्य स्थळ हाजराफॉल सध्या दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट....
पर्यटकांना आकर्षित करतोय हाजराफॉल
ठळक मुद्देसाहसी खेळांसह धबधब्याचा आनंद : मन प्रसन्न करणारे नैसर्गिक वातावरण