शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:40 IST

कला ही जन्मजात असते. व्यासंगाने ती अधिक वृद्धींगत होत जाते. कलाकार हा जन्मताच कलाकार असतो. तो निर्माण करता येत नाही, म्हणून कला ही नशेसारखी असते.

ठळक मुद्देझाडपट्टीतील कलांवताचे नाव पोहोचले सर्वत्र : अनेकांना पाडली भुरळ

राजकुमार भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : कला ही जन्मजात असते. व्यासंगाने ती अधिक वृद्धींगत होत जाते. कलाकार हा जन्मताच कलाकार असतो. तो निर्माण करता येत नाही, म्हणून कला ही नशेसारखी असते. एकदा ती रक्तात भिनली की माणसाला कशाचेच भान नसते. कलेत हरवून जाणारा आपल्या कलेने रसिकांची मने तृप्त करणारा त्यांना भावविभोर करणार असाच एक कलावंत गोंदिया जिल्ह्यात आहे.गुरुदास राऊत हे त्या कलावंताचे नाव. झाडीपट्टीतील उत्तम तबला वादक म्हणून त्यांची ओळख आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी हे त्यांचे मुळ गाव असून त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र पोटाची खळगी भरणे आवश्यक होते.गुरुदासला लहानपणापासून ढोलकी वाजविण्याचा छंद होता. म्हणून गुरुदासनी ढोलकी हेच आपले जीवन गाणे आहे असे समजून आयुष्याला नवा आयाम दिला. ढोलकीलाच साक्षी ठरवून त्यांनी त्याच्या जीवनाला प्रारंभ केला. सध्या ते वर्षभरात ६० ते ७० कार्यक्रम घेतात. यातून प्राप्त होणाºया उत्पन्नावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याच्या कर्तृत्व आणि गुण कौशल्यामुळेच गुरुदासला गुरु पेंटर बनविले. झाडीपट्टीत ढोलकी वादक म्हणून गुरुदास राऊत यांचे मोठे नावलौकीक आहे. ढोलकीच्या तालावार हे शब्द कानावर पडले की, वेगळ्याच बहारदार लावण्यांची आठवण होते. लावणी आणि ढोलकी हे एक समीकरण आहे. ढोलकी शिवाय लावणी नाही आणि लावणी शिवाय ढोलकीची रंगत येत नाही. या दोन्ही जोडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुरुदासच्या हाताची थाप पडली की नृत्यांगणेचे पैजन थिरकते. समजा मे संग नाटकाचे व्यासपीठ असो की लावण्याचे कार्यक्रम गुरुदास आणि ढोलकी वेगळे नाहीच. ढोलकीवर पडणारी थाप त्याचा जिवनाचा श्वास होईल, उदरनिर्वाहाचे साधन होईल, एक सुंदर जीवन गाणे होईल, असे कदापिही त्यांना वाटत नव्हते. पण हे अगदी सत्य आहे. गुरुदास म्हणतो ढोकली आणि ढोलकी म्हणजे गुरु पेंटर.वयाच्या दहाव्या वर्षांपासून रमले संगीतातवयाच्या १० वर्षापासूनच गुरुदास संगीतात रमला. एक दिवस झाडीपट्टीच्या रंगभूमिमध्ये एक कलाकार म्हणून नाव रुपाला येईल असे त्याला कधी वाटले नव्हते. त्यांने रसिकांची मने जिंकली. एक उकृष्ट तबला व ढोलकी वादक म्हणून त्याचे नावाची ख्याती आता दूरवर पोहचली आहे.शासनाच्या विविध उपक्रमात सहभागशासनाच्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमात कलापथकात ते ढोलकीवादक म्हणून काम करतात. जलस्वराज प्रकल्प, हुंडाबळी, पहाट, एड्स, स्वच्छताविषयक अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुदासने कलेचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव आता संपूर्ण महाराष्टÑभर पोहचले आहे. झाडीपट्टीतील नाटके व हौसी नाटक कंपन्यामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. यामुळेच ढोलकी किंवा तबला वादकासाठी त्यांची नेहमी मागणी असते. त्यांच्या ढोलकी व तबल्याच्या तालावर प्रेक्षक अरक्षश: बेधुंद होवून थिरकतात. हीच त्यांच्या कलेला मिळालेली दाद आहे. शास्त्रीय पद्धतीने संगीत साथ देणारा हा कलाकार अगदी आगळा वाटतो.